बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत(Sushant Singh Rajput)च्या निधनाला अडीच वर्षे उलटली असली, तरी हा अभिनेता आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे. अलीकडे सुशांतच्या प्रकरणाबाबत नवीन खुलासा झाला आणि पुन्हा हे प्रकरण चर्चेत आले होते. दरम्यान एक नवीन माहिती समोर आली आहे की सुशांतच्या ज्या घरात भाड्याने राहत होत्या त्या घरात लवकरच एक नवीन भाडेकरू येणार आहे.
'एमएस धोनी' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या सुशांत सिंग राजपूतने मुंबईतील वांद्रे येथे ज्या भाड्याच्या घरात अखेरचा श्वास घेतला. ते घर अडीच वर्ष बंद होते. अखेर त्या घरात आता नवीन भाडेकरू येणार असल्याचे बोलले जात आहे. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर, वांद्रे पश्चिम येथील कार्टर रोडवर बांधलेले हे आलिशान घर सुमारे अडीच वर्षांपासून बंद असल्याची माहिती आहे.
२०२० मध्ये लॉकडाऊन दरम्यान बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने त्याच्या भाड्याच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर हे आलिशान घर रिकामेच आहे. मात्र, आता फ्लॅटला नवीन मालक मिळणार आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, फ्लॅटचे मालक सध्या परदेशात राहतात. त्यांनी हे घर कोणाला तरी भाड्याने देण्याची योजना आखली आहे. नवीन भाडेकरूला या घरासाठी दरमहा सुमारे ५ लाख रुपये भाडे द्यावे लागणार आहे.
रिपोर्टनुसार इच्छुक पक्ष घराच्या मालकाशी चर्चा करत आहे आणि लवकरच करार दाखल होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी, एका फ्लॅट ब्रोकरने उघड केले की काही संभाव्य भाडेकरूंना जागा भाड्याने देण्यास प्रतिबंध करण्यात आला होता, परंतु आता लोकांनी हे बदलण्यास सुरुवात केली आहे कारण अभिनेत्याच्या मृत्यूला बराच काळ लोटला आहे.