Join us

'द ग्रेट इंडियन कपिल शो' मधून सलमान खानचा 'हा' किस्सा हटवण्यात आला, काय आहे तो किस्सा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 19:30 IST

'द ग्रेट इंडियन कपिल शो' मधून पहिल्याच एपिसोडमधला सलमान खानचा हा रंजक किस्सा हटवण्यात आलाय. नीतू कपूरने सांगितलेला हा किस्सा काय? जाणून घ्या

'द ग्रेट इंडियन कपिल शो' शोचा पहिला भाग शनिवारी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. पहिल्या भागात रणबीर कपूर, नीतू कपूर आणि रणबीरची बहिण रिद्धिमा सहभागी झाले होते. कपूर कुटुंबाने या शोमध्ये अनेक धम्माल किस्से सांगितले. दर्शकांनी सुद्धा या किस्स्यांना पसंती दिली. अशातच 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मधील पहिल्या भागातला सलमान खानचा किस्सा हटवण्यात आला. काय होता तो किस्सा? जाणून घ्या.

'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये रिद्धिमाने सांगितलं की, ती सलमान खानची मोठी फॅन आहे. याशिवाय तिच्या लग्नाला सलमान उपस्थित होता. लेकीच्या लग्नात ऋषी कपूर यांनी पाहुण्यांसाठी खुप दारु मागवली होती. लग्नात काही वेळांनी ऋषी कपूर यांच्या कानावर आलं की दारु संपली म्हणून! खुप जास्त स्टॉक मागवूनही दारु कशी संपली असा प्रश्न ऋषी यांना पडला. 

ऋषी तातडीने बार काऊंटरकडे गेले. तेव्हा त्यांना तिकडे दिसलं की, सलमान खान बारटेंडर बनून पाहुण्यांना दारु सर्व्ह करत होता. चक्क सलमान दारू देतोय म्हटल्यावर अनेक जण भरला ग्लास रिकामा करत पुन्हा पुन्हा दारु मागत होते. ऋषी कपूर यांनी हे पाहताच ते सलमानला म्हणाले, "तू इथून जा. नाहीतर पूर्ण खजाना रिकामा होईल." हा किस्सा नेटफ्लिक्सने यूट्यूबवर रिलीज केलाय. 

टॅग्स :सलमान खानकपिल शर्मा रिद्धिमा कपूररणबीर कपूरनितू सिंग