अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या त्याच्या 'चंदु चॅम्पियन' (Chandu Champion) चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित झाला. सिनेमातीलकार्तिक आर्यनच्या अभिनयाचं जोरदार कौतुक होत आहे. यातच कार्तिकने त्याच्या आईसोबत कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये हजेरी लावली. यावेळी आपल्या कशी सून हवी आहे, याचा खुलासा कार्तिकच्या आईने केला.
कार्तिक आर्यनला अनेकदा तो कोणत्या मुलीशी लग्न करणार आहे, असं विचारलं जात. आता नुकतेच या प्रश्नाचे उत्तर अभिनेत्याऐवजी त्याच्या आईनेच दिलं आहे. कार्तिकच्या आई माला तिवारी यांनी त्यांच्या सुनेविषयी असलेल्या आपेक्षांविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत. कोणी मॉडेल किंवा अभिनेत्री नाही तर एक डॉक्टर मुलगी सून म्हणून हवी असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, कार्तिकचं नाव आतापर्यंत काही अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. यात सारा अली खान आणि अनन्या पांडे यांची नावे आहेत. 'लव आज कल' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान कार्तिक आणि सारा एकमेकांना डेट करायला सुरूवात केली होती. मात्र कालांतराने त्यांचे ब्रेकअप झाले होते. सारापासून वेगळे झाल्यानंतर 'पती पत्नी और वो'च्या शूटिंगदरम्यान अभिनेत्याचे नाव अनन्या पांडेसोबत जोडलं गेलं होतं.पण, त्यांचं नातही जास्त काळ टिकलं नाही.
लव्ह लाइफमुळे कार्तिक बऱ्याचदा चर्चेत येत असतो. त्याने एका मुलाखतीत प्रेमात तो अनलकी असल्याचं म्हटलं होतं. शिवाय, तो सिंगल असल्याचेही त्याने सांगितलं. कार्तिक आर्यन त्याच्या आईसोबत नेटफ्लिक्सच्या द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. जो या सीझनचा ग्रँड फिनाले भाग असणार आहे.