काश्मिरी पंडितांच्या विस्थापनावरील 'द काश्मीर फाइल्स' (The kashmir files) या चित्रपटासंदर्भात केरळकाँग्रेसने केलेल्या एका ट्विटवरून जबरदस्त गदारोळ सुरू झाला आहे. खरे तर, काश्मिरी पंडितांच्या विस्थापनासंदर्भात केरळकाँग्रेसच्या 'फॅक्ट चेक' ट्विटला प्रत्युत्तर देत, काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे एक पत्रच शेअर केले आहे.
अग्निहोत्री यांनी इंदिरा गांधी यांचे पत्र शेअर करत लिहिले, "प्रिय राहुल गांधी जी, आपल्या आजींचे मत वेगळे होते." 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेला 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट, 1980च्या दशकाच्या उत्तरार्धात कश्मिरी पंडितांची विस्थापनाच्या वेळी झालीली दुर्दशा दाखवत असल्याचा दावा करतो. तथापि, काँग्रेसच्या केरळ युनिटने आरोप केला आहे, की आता केंद्र शासित प्रदेशात मारल्या गेलेल्या मस्लिमांची संख्या कश्मिरी पंडितांच्या तुलनेत अधिक आहे. जे दहशतवादी हल्ल्यांचा बळी ठरले आहेत.
विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर इंदिरा गांधी यांचे एक पत्र शेअर केले आहे, जे त्यांनी अमेरिकेत राहणाऱ्या डॉ निर्मला मित्रा यांना पाठवले होते. हे पत्र डिसेंबर 1981 मध्ये लिहिण्यात आले होते. या पत्रात, इंदिरा गांधी यांनी लिहिले आहे, “मला आपली चिंता समजते. मीही दुःखी आहे, ना आपण, ज्या काश्मिरमध्ये जन्मलात, ना मी, जिचे पूर्वज कश्मिरी आहेत, दोघीही कश्मिरात एक जमिनीचा छोटा तुकडाही विकत घेऊ शकत नाही. पण सध्या, परिस्थिती माझ्या हातात नाही. हा मुद्दा सोडविण्यासाठी, ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या सध्या मी करू शकत नाही. कारण भारतीय आणि परदेशी माध्यमे, दोघीही माझी छबी एक दबंग सत्तावादी म्हणून दाखवत आहेत.
त्या पुढे म्हणाल्या, "लडाखमध्ये काश्मिरी पंडित आणि बौद्ध यांना अत्यंत वाईट वागणूक दिली जात आहे. तसेच त्याच्यासोबत प्रचंड भेदभावही केला जात आहे." तत्पूर्वी, केरल काँग्रेसने ट्विट केले होते की, "कश्मिरी पंडितांच्या संदर्भात तथ्य: ते दहशतवादीच होते, ज्यांनी पंडितांना निशाणा बनवले. गेल्या 17 वर्षांत (1990-2007) झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत 399 पंडित मारले गोले आहेत. याच काळात दहशतवाद्यांकडून मारल्या गेलेल्या मुस्लिमांची संख्या 15,000 आहे."