दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा (Vivek Agnihotri) ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा सिनेमा प्रचंड गाजला. देशभर या चित्रपटाची चर्चा झाली. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं 200 कोटींहून अधिक कमाई केली. 1990 साली काश्मिरी पंडितांवर झालेला अत्याचार आणि त्यांचं पलायन यावर आधारित असलेला या चित्रपटानं यादरम्यान काही वादही ओढवून घेतले. काही लोकांनी या चित्रपटाला विरोध करत, हा सिनेमा समाजात फूट पाडणारा व मुस्लिम विरोधी असल्याचं मत नोदवलं. आता या चित्रपटाबद्दल विकिपीडियानंही (Wikipedia) काहीसं असंच मत नोंदवलं आहे आणि ते पाहून विवेक अग्निहोत्री प्रचंड संतापले आहेत.
विकिपीडियावर काय लिहिलंय?विकिपीडियाने ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला काल्पनिक म्हटलं आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ हा 2022 चा भारतीय हिंदी भाषेतील ड्रामा आहे. विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात काश्मीरच्या वादग्रस्त भागातील काश्मिरी हिंदूंच्या पलायनाची काल्पनिक कहाणी दाखवली गेली आहे. चित्रपटात 1990 मध्ये सुरू पलायनाला सामूहिक नरसंहार दाखवला आहे. अनेकांच्या मते, हे चूक आहे आणि कटकारस्थानाच्या सिद्धांताशी संबंधित आहे, अशा आशयाची माहिती विकिपीडियानं आपल्या पेजवर दिली आहे.
भडकले विवेक अग्निहोत्रीविकिपीडियाने ‘द काश्मीर फाइल्स’ दिलेली ही माहिती वाचून विवेक अग्निहोत्री चांगलेच भडकले आहेत. याचा स्क्रिनशॉट शेअर करत, त्यांनी एक टिष्ट्वट केलं आहे. ‘प्रिय विकिपीडिया, तुम्ही यात इस्लामोफोबिया, प्रोपेगंडा, संघी व कट्टर असे शब्द टाकायला कदाचित विसरला. तुम्ही तुमची धर्मनिरपेक्ष ओळख गमावत आहात. ताबडतोब याला एडिट करा,’अशा आशयाचं टिष्ट्वट विवेक अग्निहोत्री यांनी केलं आहे.