Join us

The Kashmir Files : ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा म्हणजे कचरा..., प्रसिद्ध दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 10:18 AM

The Kashmir Files : अलीकडे इस्रायली निर्माता नादव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा प्रोपगंडा व वल्गर  असल्याचं म्हणत वाद निर्माण केला होता. आता दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ला कचरा संबोधलं आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ ( The Kashmir Files ) या सिनेमानं रिलीजनंतर बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर आधारित हा सिनेमा रिलीज होऊन बराच काळ लोटला. पण अद्यापही या सिनेमाची चर्चा थांबलेली नाही. अलीकडे इस्रायली निर्माता नादव लॅपिड यांनी इफ्फी महोत्सवात ‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा प्रोपगंडा व वल्गर  असल्याचं म्हणत वाद निर्माण केला होता. आता पटकथा लेखक व प्रसिद्ध दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा ( Saeed Akhtar Mirza) यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ला कचरा संबोधलं आहे.

नसीम आणि अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यो आता हैं  हे सईद अख्तर मिर्झा, मोहन जोशी हाजिर हो, सलीम लंगडे पे मत रो हे त्यांचे चित्रपट खूप गाजलेत.  नुक्कड आणि  इंतजार अशा मालिकांचं दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे. नुकतंच त्यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत ते ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल बोलले.

काय म्हणाले सईद मिर्झा‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा माझ्यासाठी तरी कचरा आहे. पण मग काश्मिरी पंडितांच्या समस्या म्हणजे कचरा आहेत का? तर नाही. असं अजिबात नाही. त्यांच्या समस्या खऱ्याच आहेत. पण हे फक्त काश्मिरीं हिंदूंनीच भोगलं का? तर नाही त्यात काश्मिरी मुस्लीमही आहेत. काश्मिरी मुस्लिमांनीही गुप्तचर संस्था, तथाकथित राष्ट्रीय हितसंबंध असलेली राष्ट्रे आणि सीमेपलीकडून पगार घेणारे लोक, जे सतत गोंधळ निर्माण करत आहेत, या सगळ्यांच्या षडयंत्रात खूप काही भोगलं. मुद्दा बाजू घेण्याचा नाही. माणूस व्हा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा, असं मिर्झा म्हणाले.  सध्या देशभक्ती हे पैसा कमवण्याचं साधन ठरत आहे आणि हे जगातले सर्वच देश करत आहेत, असंही ते म्हणाले.

टॅग्स :द काश्मीर फाइल्सविवेक रंजन अग्निहोत्रीबॉलिवूड