चित्रपट दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांचा चित्रपट 'काश्मीर फाईल्स'वर गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ज्युरींच्या प्रमुखांनी टीका केली. यावेळी त्यांनी ही “प्रपोगंडा फिल्म” असल्याचं त्यांनी म्हटलं. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी मुख्य भूमिकेत आहेत. यावरुन आता वाद सुरू झाला आहे, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 'काश्मीर फाईल्स'या चित्रपटावर टीका करणारे इफ्फीतील ज्युरी नादव लॅपिड नेमके कोण आहेत, असा प्रश्न सर्वांना पडला आहे, चला जाणून घेऊया.
गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) 53 व्या समारंभात ज्युरी प्रमुख लॅपिड यांनी समारोप समारंभाला संबोधित करताना हे भाष्य केले.
समारंभात आपल्या भाषणादरम्यान लॅपिड यांनी चित्रपटावर टीका केली. "आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 15 चित्रपट आले होते. त्यापैकी चौदा चित्रपटांमध्ये सिनेमॅटिक गुण होते. आणि त्यांनी अनेक मुद्दे मांडले. 15व्या चित्रपटाने, द काश्मीर फाइल्सने आम्ही सर्वजण अस्वस्थ आणि आश्चर्यचकित झालो. एखाद्या असभ्य आणि प्रचारक चित्रपटाप्रमाणे, अशा प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाच्या कलात्मक स्पर्धा विभागासाठी अयोग्य." आहे, असं भाष्य त्यांनी केले.
लॅपिड यांच्या भाषणाने देशात नव्या वादाला तोंड फुटले. सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री आणि अनुपम खेर यांनी लॅपिडवर टीका केली. तर अभिनेत्री स्वरा भास्करने लॅपिड यांची बाजू घेतली.
यावरुन भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलन यांनी लॅपिड यांच्यावर टीका केली. नादव लॅपिडचा जन्म 1975 मध्ये ज्यू कुटुंबात झाला. तो अनेक वर्षांपासून इस्रायली फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहे. त्यांनी तेल अवीव विद्यापीठात शिक्षण घेतले. यापूर्वी त्यांनी इस्रायली सैन्यातही काम केले आहे. सैन्यात सक्तीच्या सेवेनंतर ते पॅरिसला गेले. त्यानंतर जेरुसलेममधील सॅम स्पीगल फिल्म अँड टेलिव्हिजन स्कूलमध्ये पदवी मिळवली आणि मायदेशी परतले.
नादव लॅपिड यांनी जगाला अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. शॉर्ट फिल्म्स आणि डॉक्युमेंटरी बनवण्यात त्यांचे मोठे नाव आहे. लॅपिडने आतापर्यंत एकूण 13 चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 2011 मध्ये लोकार्नो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये लोकार्नो फेस्टिव्हल स्पेशल ज्युरी पारितोषिक तसेच जेरुसलेम फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याच्या पहिल्या फीचर फिल्म 'पोलिसमन'ला अनेक पुरस्कार मिळाले. त्याचा चित्रपट त्याच्या मुख्य पात्र, इस्रायलच्या दहशतवादविरोधी दलाचा प्रमुख याद्वारे विविध थीम एक्सप्लोर करतो. 'किंडरगार्टन टीचर' (2014) मध्ये, लॅपिडने शिक्षक आणि लहान मुलामधील नाते सुंदरपणे चित्रित केले आहे. कान्समधील आंतरराष्ट्रीय समीक्षक सप्ताहात त्यांचा चित्रपट प्रदर्शित झाला. या वर्षीच्या बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'समानार्थी शब्द' (2019) ने पुरस्कार जिंकला. सैन्य सोडल्यानंतर आपली ओळख सोडण्याच्या प्रयत्नात पॅरिसला पळून गेलेल्या एका तरुण इस्रायलीची ही कथा आहे.
नादव लॅपिड हे यापूर्वीही आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिले आहेत. शोमरॉन या त्यांच्या एका चित्रपटाच्या फिल्म फंडाच्या लाँचिंगवेळी त्यांनी वादग्रस्त विधान केले होते.