Join us

वयाच्या केवळ ३१ व्या वर्षी मल्याळम फिल्ममेकरचं निधन, पहिल्या सिनेमाच्या रिलीजआधीच घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 9:39 AM

साऊथ मनोरंजनसृष्टीवर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे.

साऊथ मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. केरळचे  फिल्ममेकर जोसेफ मनु जेम्स यांचे निधन झाले आहे. त्यांचा आगामी सिनेमा 'नैन्सी रानी' रिलीज होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. ते केवळ ३१ वर्षांचे होते. 

जोसेफ मनु जेम्स हे न्युमोनिया आणि हिपॅटिटिस (Hipatitis) आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर राजगिरी रुग्णालयात उपचार सुरु होते. 'नैन्सी रानी' हा त्यांचा पहिलाच सिनेमा होता. सिनेमा रिलीजसाठी शेड्युलही झाला होता. यामध्ये  आहाना क्रिश्ना आणि अर्जुन अशोकन यांची मुख्य भुमिका आहे. सिनेमा पोस्ट प्रोडक्शन स्टेजमध्ये होता. अजु वर्गेस, श्रीनिवासन, इंद्रन्स, सनी वेन यांचीही चित्रपटात भूमिका होती. अजु यांनी ट्वीट करत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी लिहिले, 'मित्रा, खूप लवकर निघून गेलास.'

मनु यांनी मल्याळम आणि कन्नड सिनेमातून २००४ साली अभिनेता म्हणून फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. 'आय अॅम क्युरियस' हा त्यांचा पहिलाच सिनेमा होता. जोसेफ यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी मनु नैना आहेत.

टॅग्स :केरळसिनेमामृत्यू