The Kerala Story, Asifa: 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात असिफाची भूमिका साकारणाऱ्या सोनिया बालानीला (Sonia Balani) धमक्या येत आहेत. कुणी जीवे मारण्याची धमकी देत आहे तर कुणी खालच्या भाषेत टीका करत आहे. बळजबरीने धर्मांतरित झालेल्या सुमारे 7,000 मुलींना भेटल्याचे सोनियाने. आता त्या सर्व मुली आश्रमात राहत आहेत. या सर्व गोष्टींवर खुलेपणाने बोलल्यामुले तिला धमक्या मिळत असल्याचे तिने सांगितले. पण माझ्यासाठी ही गोष्ट नवीन नाही, कारण यापूर्वीही अशी भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना धमक्या येत होत्या, असे तिने नमूद केले.
"मी स्वतः पीडित मुलींना भेटले आहे. त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या आहेत. मुलींबद्दल ऐकून मला खूप वाईट वाटलं. या मुलींची गोष्ट सर्वांना सांगायची होती, म्हणूनच 'द केरळ स्टोरी'मध्ये असिफाची व्यक्तिरेखा साकारण्याचे मी ठरवले आणि पडद्यावर असिफाचे पात्र पूर्ण प्रामाणिकपणे साकारले. खऱ्या आयुष्यात मी असिफाच्या पात्रापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. सुरुवातीला निगेटिव्ह कॅरेक्टर्स करायच्या नाहीत असं वाटत होतं, पण आता आव्हानात्मक भूमिका मिळाल्याने मी ते पात्र साकारलं, पण त्यानंतर मला विविध प्रकारच्या धमक्या मिळत राहिल्या. अजूनही मला धमक्या किंवा भीती घालण्याचा प्रयत्न करणारी पत्रं येतात," असं सोनियाने सांगितले.
The Kerala Story सिनेमात हिजाबमध्ये दिसणारी आसिफा खऱ्या आयुष्यात 'ग्लॅमर क्वीन'!
"या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता प्रेक्षक चित्रपटाचा विषय आणि आशय बघायला जात आहेत. आता त्यांना स्टारकास्टशी फारसं घेणंदेणं नाही. त्यामुळेच 'द केरळ स्टोरी'ला प्रेक्षकांनी पसंती दिली. मुस्लिम मुलींना हा चित्रपट आवडला आहे. मुस्लिम मुलींनी मला भेटून अभिनयाचे व कामगिरीचे कौतुक केले आहे," असे सोनियाने आवर्जून सांगितले.
हॉस्टेलवर शिकणाऱ्या मुलींना व पालकांना सोनियाचा सल्ला
बाहेर शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी तसेच त्यांच्या पालकांनी त्यांच्या रूममेट्स आणि वर्गमित्रांची संपूर्ण माहिती घ्यावी, कोणाच्याही फसवणुकीत अडकू नये, असे आवाहन सोनियाने केले. पालकांनीही मुलांवर बारीक लक्ष ठेवले पाहिजे, असंही ती म्हणाली.