Join us

विरोध, बंदीच्या वादात अडकलेला ‘द केरळ स्टोरी’ बॉक्स ऑफिसवर सुसाट; अवघ्या ५ दिवसांत इतक्या कोटींचा गल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 10:31 AM

कुठे बंदी तर कुठे विरोध होत असूनही 'द केरळ स्टोरी' सिनेमा बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करतोय.

सुदिप्तो सेन यांच्या 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) सिनेमाला वाढता विरोध थांबण्याचे नावच घेत नाही. अनेक जणांनी सिनेमाला पाठिंबा दिलाय मात्र काही घटकांनी तीव्र विरोधही दर्शवला आहे. त्यातच पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यात सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे.  कुठे बंदी तर कुठे विरोध असूनही सिनेमा छप्परफाड कमाई करतोय.

दीप्तो सेन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या वादग्रस्त ‘द केरळ स्टोरी’बाबत प्रेक्षकांच्या मनात प्रचंड कुतूहल होतं. काही ठिकाणी पहिल्या दिवशी चोख पोलिस बंदोबस्तामध्ये सिनेमाचे शो दाखवले गेल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून प्रेक्षकांची गर्दी वाढू लागल्याचं समोर आलेल्या आकड्यांवरून समजतं. 5 दिवसांत या सिनेमाने ५० कोटींची कमाई केली आहे. छोट्या बजेटमध्ये तयार झालेला हा सिनेमा जोरदार कमाई करतो आहे. 

५ मे रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाने पहिल्यादिवशी ८ कोटींची कमाई केली होती. पहिल्या विकेंडला सिनेमाने ३५ कोटींचा गल्ला जमावला. सोमवारी या सिनेमाने १० ते ११ कोटींची कमाई करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. रिपोर्टनुसार रिलीजच्या पाचव्या दिवशी सिनेमाने ११ कोटींचा बिझनेस केला आहे. याच सोबत ५ दिवसांत सिनेमाने ५० कोटी कमावले आहेत. 

आता हा सिनेमा १०० कोटींचा आकडा कधी पार करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.  प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे ‘द केरळ स्टोरी’ पाहण्यासाठी गर्दी उसळत असल्याचं चित्रपट व्यवसाय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. येत्या काही दिवसांत सिनेमा १०० कोटी पार करेल अशी शक्यता ट्रेड अॅनालिस्टने वर्तवली आहे.

काय आहे सिनेमाची कथा?'द केरळ स्टोरी' हा सिनेमा ३ मुलींची कथा आहे. त्यांचं ब्रेनवॉश केलं जातं आणि धर्मबदल केला जातो. यानंतर त्यांना ISIS च्या हवाली केलं जातं. दरम्यान एक मुलगी निसटून भारतात येते आणि घडलेली सर्व घटना सांगते. त्या मुलीचं पात्र अभिनेत्री अदा शर्माने साकारलं आहे. तिच्या भूमिकेचं विशेष कौतुक होतंय. 

टॅग्स :अदा शर्माकेरळबॉलिवूड