The Kerala Story: गेल्या काही दिवसांपासून वादात अडकलेला 'द केरळ स्टोरी'(The Kerala Story) चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटावर भारतात बंदी घालण्याची मागणी होत असतानाच, चारच दिवसात सिनेमात ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. आता हा चित्रपट 37 देशांमध्ये प्रदर्शित होत आहे. दरम्यान या चित्रपटाचं सहा दिवसांचे कलेक्शनही समोर आले आहे.
बॉक्स ऑफिस ट्रॅकर सचनिकच्या आकडेवारीनुसार, या चित्रपटानं सहा दिवसात 68.86 कोटी एवढी कमाई केली आहे. ५ मे रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाने पहिल्यादिवशी ८ कोटींची कमाई केली होती. पहिल्या विकेंडला सिनेमाने ३५ कोटींचा गल्ला जमावला. सोमवारी या सिनेमाने १० ते ११ कोटींची कमाई करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पाचव्या दिवशी सिनेमाने ११ कोटींचा बिझनेस केला आहे. तर सहाव्या दिवशी या सिनेमाने 12 कोटींची कमाई केली आहे.
आता हा सिनेमा १०० कोटींचा आकडा कधी पार करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे ‘द केरळ स्टोरी’ पाहण्यासाठी गर्दी उसळत असल्याचं चित्रपट व्यवसाय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. येत्या काही दिवसांत सिनेमा १०० कोटी पार करेल अशी शक्यता ट्रेड अॅनालिस्टने वर्तवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरी हा चित्रपट देशातील विविध राज्यांमध्ये टॅक्स फ्री करण्यात आला पण तामिळनाडूसह पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. आता हा चित्रपट 37 देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.