अदा शर्मा स्टारर 'The Kerala Story' बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करत आहे. प्रत्येक दिवसागणिक चित्रपटाच्या कमाईत वाढ होत आहे. ५ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या सुदीप्तो सेनच्या 'द केरला स्टोरी' या चित्रपटाने चांगलाच वाद निर्माण केला होता. कुठे बंदी तर कुठे विरोध असूनही सिनेमा छप्परफाड कमाई करतोय.
दीप्तो सेन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या वादग्रस्त ‘द केरळ स्टोरी’बाबत प्रेक्षकांच्या मनात प्रचंड कुतूहल होतं. छोट्या बजेटमध्ये तयार झालेला हा सिनेमा जोरदार कमाई करतो आहे. ५ मे रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाने पहिल्यादिवशी ८ कोटींची कमाई केली होती. पहिल्या विकेंडला सिनेमाने ३५ कोटींचा गल्ला जमावला. सोमवारी या सिनेमाने १० ते ११ कोटींची कमाई करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ५ दिवसांत सिनेमाने ५० कोटी कमावले आहेत.
द केरळ स्टोरी रिलीज होऊन एक आठवडा झाला आहे. हा चित्रपट गेल्या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. सुदीप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटाने बुधवारी सुमारे १२ कोटींची कमाई केली, तर गुरुवारीही चित्रपटाचे कलेक्शन चांगलेच झाले. या चित्रपटाने एकाच दिवशी जवळपास 12 कोटींची कमाई केली. चित्रपटाने आत्तापर्यंत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 80.86 कोटींची कमाई केली आहे आणि वीकेंड संपण्यापूर्वी 100 कोटी क्लबमध्ये एंट्री करू शकतो.
देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर, वादांमुळे 'द केरळ स्टोरी'ला कलेक्शनच्या बाबतीत फायदा झाला आहे, परंतु आता हा चित्रपट जगातही चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 81 कोटींचा व्यवसाय केला असून लवकरच हा चित्रपट जगभरात 100 कोटींचा आकडा पार करेल.