'द केरळ स्टोरी' सिनेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. विपुल शहा यांच्या प्रोडक्शनखाली बनलेल्या फिल्मबाबत अनेक जण आपत्ती दर्शवत आहेत. काहीजण याला अजेंडा म्हणत आहेत तर काही लोक याची तुलना 'काश्मीर फाईल्स'शी करत आहेत. सध्या प्रकरण कोर्टात पोहोचलं आहे. आता या वादात प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान (A R Rahman) यांनीही उडी घेतली आहे.
'द केरळ स्टोरी' वादात ए आर रहमान यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ पाहून लोकांमधून पुन्हा दोन प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत. काही जण सहमती दर्शवत आहेत तर काहींनी कडाडून विरोध केलाय. एक जोडपं मशिदीत सात फेरे घेत असल्याचा व्हिडिओ त्यांनी ट्वीट केलाय. याला कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले."वाह...माणुसकीवर नि:स्वार्थ प्रेम असलं पाहिजे"
'कॉम्रेड फ्रॉम केरला' या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आणखी एक केरळ स्टोरी असं हॅशटॅग व्हिडिओला देण्यात आलंय. हाच व्हिडिओ ए आर रहमान यांनी रिशेअर केलाय.
हा व्हिडिओ 2020 सालचा आहे. यामध्ये एक जोडपं मशिदीत हिंदू रितीप्रमाणे लग्नबंधनात अडकत असल्याचा हा व्हिडिओ आहे. रहमान यांनी केरळची एक बाजू या व्हिडिओतून मांडली आहे. जिथे प्रेम आणि सद्भावनाची अनेक उदाहरणं दिसून येतील.