गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) सातत्याने चर्चेत येत असते. काही दिवसांपूर्वी तिचा द केरळ स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हा पासून ती खूपच चर्चेत आली आहे. सुदिप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) सिनेमात अदा शर्माने शालिनी उन्नीकृष्णची भूमिका केली आहे. याआधी तिने मालिकेत तसेच हिंदी,तामिळ,तेलुगू तसंच मल्याळम चित्रपटातूनही काम केले आहे.
नुकत्याच एका मुलाखतीत अदा शर्मा हिने सांगितले की, हिंदी सिनेइंडस्ट्रीत ती चांगल्या-वाईट अशा सगळ्या लोकांना भेटली आहे. हिंदी सिनेइंडस्ट्रीची एक गोष्ट जी सगळ्यात जास्त तिला खटकते ती म्हणजे इथे स्त्री आणि पुरुषमध्ये मोठा भेदभाव केला जातो. अदाने बॉलिवूडवर लिंग भेदभावाचा खळबळजनक आरोप केला आहे. ती म्हणते की इथे अभिनेत्रींना सेटवर खूप लवकर बोलावले जाते पण अभिनेते मात्र आरामात सेटवर येतात.
चॅट शोमध्ये केले बॉलिवूडबाबत अनेक खुलासे
अभिनेत्रीने सिद्धार्थ कन्ननच्या चॅट शोमध्ये बॉलिवूडबाबत अनेक खुलासे केले. ती म्हणाली की, याचा अर्थ असा नाही की मला कुठल्या इतर सिनेइंडस्ट्रीत काम करताना खूप मजा आली. मी नॉर्थ आणि साऊथच्या लोकांसोबत देखील काम केले आहे. दोन्ही ठिकाणी काही खूप चांगले तर काही हैराण करुन सोडणारी लोक देखील होती. मला आता हे पटले की जर तुमचा दिग्दर्शक चांगला आहे तर मग तुमची भाषा कोणतीही असो, सगळे चांगलेच होते. पण जर तुमचा दिग्दर्शक चांगला नाही तर मग भाषेचे हे अंतर नेहमीच त्रास देऊ शकते.
अभिनेता आणि अभिनेत्रींच्या मानधनात आढळते मोठी तफावत
अदा शर्मा पुढे म्हणाली, 'मी सगळ्या इंडस्ट्रीत चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही लोकांना भेटली आहे. पण मला वाटते की बॉलिवूडमध्ये लिंग भेदभावामुळे अभिनेता आणि अभिनेत्रींच्या मानधनात देखील जी मोठी तफावत आढळते त्यावर बोलले गेले पाहिजे. मला ही गोष्ट खूप विचित्र वाटते की आधी हिरोईनला सेटवर बोलवतात आणि मग सांगतात की शूट सुरू व्हायला वेळ आहे. थांबावे लागेल. मग अभिनेत्री बिचारी शांत बसली आहे..चीडचीड करत नाही तेव्हा हे जाऊन हिरोच्या मॅनेजरला आधी बोलावतात आणि त्यानंतर मग हिरोला सेटवर येण्यासाठी सांगतात. मात्र हिरोईन बिचारी आधीपासनंच येऊन बसलेली असते सेटवर. मला बॉलिवूडमध्ये लिंग भेदभाव खूप दिसला अन् दिसतो. या अशा वातावरणात काम करायला अजिबात मजा येत नाही.