The Kerala Story : 'काही दिवस मी झोपलो नाही...', 'द केरळ स्टोरी'मध्ये दहशतवाद्याची भूमिका साकारलेल्या अभिनेत्यानं सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 05:53 PM2023-05-18T17:53:25+5:302023-05-18T17:54:12+5:30

अदा शर्माचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट द केरळ स्टोरी (The Kerala Story) बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही दिवसातच १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला.

The Kerala Story : 'I didn't sleep for a few days...', the story told by the actor who played the role of a terrorist in 'The Kerala Story' | The Kerala Story : 'काही दिवस मी झोपलो नाही...', 'द केरळ स्टोरी'मध्ये दहशतवाद्याची भूमिका साकारलेल्या अभिनेत्यानं सांगितला किस्सा

The Kerala Story : 'काही दिवस मी झोपलो नाही...', 'द केरळ स्टोरी'मध्ये दहशतवाद्याची भूमिका साकारलेल्या अभिनेत्यानं सांगितला किस्सा

googlenewsNext

अदा शर्माचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट द केरळ स्टोरी (The Kerala Story) बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही दिवसातच १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला. पण, हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर देखील अनेकांनी या चित्रपटावर टीका केली. अनेकांनी या चित्रपटाला प्रोपगंडा फिल्म, म्हटले. आता 'द केरळ स्टोरी' चित्रपटामधील अभिनेता विजय कृष्णाने (Vijay Krishna) यावर प्रतिक्रिया दिली आहे.

विजय कृष्णाने द केरळ स्टोरी  या चित्रपटात ISIS दहशतवाद्याची भूमिका केली आहे. काही लोक  'द केरळ स्टोरी' या चित्रपटाला प्रपोगंडा फिल्म म्हणत आहेत. याबाबत एका मुलाखतीत विजय कृष्णाने सांगितले की, सुरुवातीला अनेक लोक या चित्रपटाला प्रपोगंडा फिल्म म्हणत होते, पण आता चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या विचारात बदल झाला असून अनेकांनी  मेसेज करून माफी मागितली आहे. चित्रपट रिलीज होण्याआधी जेव्हा लोक टीका करत होते तेव्हा मी घाबरलो.चित्रपटामागील आमची विचारसरणी अशी नव्हती. आम्ही एक मानवी कथा दाखवण्याचा प्रयत्न करत होतो आणि खरोखरच आमचा उद्देश चार मुलींवर झालेल्या आघातांवर प्रकाश टाकणे हा होता, मात्र जेव्हा लोकांनी टीका करायला सुरुवात केली तेव्हा मी अस्वस्थ झालो आणि काही दिवस झोपलो नाही. त्यानंतर हा चित्रपट रिलीज झाला आणि दोन-तीन दिवसांनी आम्ही पाहिले की लोक चित्रपटाला पाठिंबा देत आहेत. 


'द केरळ स्टोरी' या चित्रपटात अदा शर्मासोबतच योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धी इडनानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींची कमाई केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. 

Web Title: The Kerala Story : 'I didn't sleep for a few days...', the story told by the actor who played the role of a terrorist in 'The Kerala Story'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.