Join us

Rani Mukerji:  बच्चन कुटुंबाची सून होणार होती राणी मुखर्जी, पण ‘त्या’ किसींग सीनमुळे पुढचं सगळंच फिस्कटलं...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 4:11 PM

Rani Mukerji Birthday : करिश्मा कपूरसोबतचा साखरपुडा मोडल्यानंतर अभिषेकच्या आयुष्यात राणीची एन्ट्री झाली होती. पण जया भडकल्या अन् राणी मुखर्जी व अभिषेक बच्चनचं ब्रेकअप झालं...

Rani Mukerji Birthday Special : एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी आणि लग्नानंतर आजही बॉलिवूडमध्ये सक्रीय असलेली अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) आज तिचा वाढदिवस साजरा करतेय. राणी प्रोफेशनल लाईफइतकीच तिच्या पर्सनल लाईफचीही झाली. एकेकाळी अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) व राणीचं अफेअर प्रचंड गाजलं होतं.  कधीकाळी अभिषेक व राणी रिलेशनशिपमध्ये होते. करिश्मा कपूरसोबतचा साखरपुडा मोडल्यानंतर अभिषेकच्या आयुष्यात राणीची एन्ट्री झाली होती.बंटी और बबली, युवा, कभी अलविदा ना कहना यासारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये एकत्र काम करता करता अभिषेक व राणी एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं म्हटलं जातं.

 अगदी दोघं एकमेकांच्या कुटुंबालाही भेटले होते. इव्हेंटमध्ये दोघं एकत्र जाऊ लागले होते. जया बच्चन या बंगाली असल्याने होणारी सून बंगाली असावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे जया यांना राणी पसंत होती. पण पुढे जया यांच्यामुळेच राणी बच्चन कुटुंबाची सून होऊ शकली नाही,असंही म्हटलं जातं. रिपोर्टनुसार जया यांना राणी आवडत होती. तिला सून बनवून घेण्यास त्या तयार होत्या. पण दरम्यानच्या काळात असं काही घडलं की, पुढचं सगळं फिस्कटललं. एका कारणानं जया बच्चन राणीवर अशा काही नाराज झाल्यात की, पुढे याच कारणामुळे राणी व अभिषेकचं ब्रेकअप झालं.

 जया यांच्या नाराजीचं कारण होतं, राणीने अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिलेला एक किसींग सीन. होय, संजय लीला भन्साळी यांच्या ‘ब्लॅक’ राणी मुखर्जी आणि अमिताभ बच्चन यांनी एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात राणी आणि अमिताभ यांचा एक किसिंग सीन होता. राणीने या सीनला नकार द्यावा, अशी जया यांची इच्छा होती. पण राणी तयार झाली आणि इथूनच सगळं बिनसलं. होणाऱ्या सूनेनं आपल्या होणाऱ्या सासऱ्यासोबत असा सीन दिला आणि होणाऱ्या सासूबाई नाराज झाल्या. याच कारणाने राणी आणि अभिषेक यांचं ब्रेकअप झालं.

या ब्रेकअपनंतर राणी व बच्चन कुटुंबातील संबंध इतके खराब झाले होते की अभिषेक व ऐश्वर्याच्या लग्नातही राणीला बोलवलं गेलं नव्हतं. यावर राणीने नाराजीही बोलून दाखवली होती. मी अभिषेकला मित्र समजायचे. पण तो फक्त को-स्टार निघाला, अशी ती म्हणाली होती.राणीशी ब्रेकअपनंतर अभिषेकने ऐश्वर्या रायशी लग्न केलं. तर, राणीनेही यशराज फिल्म्सचा मालक आदित्य चोप्राशी लगीनगाठ बांधली. ऐश्वर्या-अभिषेकला आराध्या नावाची मुलगी आहे, तर आदित्य-राणीला आदिरा नावाची मुलगी आहे.

टॅग्स :राणी मुखर्जीअभिषेक बच्चनजया बच्चनअमिताभ बच्चनबॉलिवूड