प्रसिद्ध गायक केके(Singer KK)चं वयाच्या ५३ व्या वर्षी कोलकाता येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शेवटच्या काळात तो कोलकाता येथे एका कॉन्सर्टसाठी आले होते. कॉन्सर्ट दरम्यान त्याची प्रकृती खालावली, त्यानंतर त्याला हॉटेलमध्ये आणण्यात आले. तिथे तो पडला. त्यानंतर त्याला कोलकाता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये (सीएमआरआय) नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पाहिले तर २०२२ हे वर्ष भारतीय गायन क्षेत्रासाठी अत्यंत वाईट ठरत आहे. केके व्यतिरिक्त इतरही अनेक मोठे स्टार्स आहेत, ज्यांनी यावर्षी जगाचा निरोप घेतला आहे.
लता मंगेशकर (Lata Mangeshkar)
बप्पी लहिरी (Bappi Lahiri)
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर अवघ्या नऊ दिवसांतच प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरी यांनीही जगाचा निरोप घेतला. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. डिस्को किंग म्हणून ओळखले जाणारे बप्पी लाहिरी जवळपास महिनाभर रुग्णालयात दाखल होते. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला पण दुसऱ्याच दिवशी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.
सिद्धू मुसेवाला
गेल्या रविवारी पंजाबमधील मानसा येथील जवाहरके गावात प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची हत्या करण्यात आली. गुन्हेगारांनी त्यांच्या कारला घेरले आणि गोळीबार केला, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. मुसेवाला यांच्या निधनाने भारत, पाकिस्तानसह इतर अनेक देशांतील त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. या घटनेनंतर पंजाबमधील मूसेवाला यांचे समर्थक सरकार आणि पोलिसांविरोधात निदर्शने करत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. कॅनडामध्ये राहणाऱ्या गोल्डी ब्रारने काही वेळातच या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. गोल्डी ब्रार हा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा सहकारी आहे.