Join us

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर आधारीत एकमेव बॉलिवूड सिनेमा, 'या' अभिनेत्याने गाजवली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 10:52 IST

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर आधारीत या बॉलिवूड सिनेमाने प्रेक्षकांंचं चांगलंच मन जिंकलं (manmohan singh)

भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये चांगला बदल घडवणारे अन् विविध योजना अमलात आणण्यात पुढाकार घेणारे भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे काल (२६ डिसेंबर) निधन झाले. फुफ्फुसात संसर्ग झाल्याने मनमोहन सिंग यांना दिल्लीतील AIMS  रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु मनमोहन सिंग यांची काल रात्री प्राणज्योत मालवली. ९२ व्या वर्षी मनमोहन सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर बॉलिवूडमध्ये एकमेव सिनेमा आला होता. जाणून घ्या.

मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर बॉलिवूडमध्ये हा सिनेमा

मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर बॉलिवूडमध्ये एकमेव सिनेमा बनला. या सिनेमाचं नाव The Accidental Prime Minister. हा सिनेमा २०१९ ला रिलीज झाला होता. या सिनेमात अक्षय खन्नाने भूमिका साकारली होती. तर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत अभिनेते अनुपम खेर झळकले होते. अनुपम खेर यांच्या संयत अभिनयाचं चांगलंच कौतुक झालं. त्यांनी मनमोहन सिंग यांचे हावभाव, देहबोली, संवादफेक हुबेहूब रंगवली होती. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळाला.

कुठे बघाल हा सिनेमा?

The Accidental Prime Minister हा सिनेमा तुम्हाला Zee 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघता येईल. या सिनेमात पंतप्रधानपदी असताना मनमोहन सिंग यांची होणारी घुसमट, त्यांचे सोनिया गांधी-राहुल गांधींसोबत असणारे संबंध अशा अनेक गोष्टींचा खुलासा झाला. दरम्यान आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. केंद्र सरकारने मनमोहन सिंग यांचं निधन झाल्यामुळे सात दिवसांचा दुखवटा जाहीर केलाय.

टॅग्स :डॉ. मनमोहन सिंगअनुपम खेरबॉलिवूड