भारत vs पाकिस्तान यांच्यादरम्यान क्रिकेटचा सामना असला की सर्व क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असते. भारत vs पाकिस्तान क्रिकेटचा सामना असला की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण टीव्हीसमोर बसलेले दिसतात. भारत vs पाकिस्तानचा क्रिकेट सामना अनेकदा शेवटपर्यंत रोमांचक स्थितीमध्ये असतो. भारत vs पाकिस्तानच्या अशाच एका सिनेमात एका बॉलिवूड सिनेमाचं पोस्टर झळकलेलं. हा सिनेमा तेव्हा चांगलाच हिट झालेला. कोणता होता हा सिनेमा?
या सिनेमाचं पोस्टर भारत vs पाकिस्तान सामन्यात झळकलेलं
ही गोष्ट १९८६ सालची. जेव्हा फिरोज खान निर्मित आणि दिग्दर्शित 'जांबाज' सिनेमा रिलीज होणार होता. अनिल कपूर आणि डिंपल कपाडीया सिनेमात प्रमुख भूमिकेत होते. तर श्रीदेवी सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार होती. सिनेमाच्या रिलीजच्या आधीपासूनच 'जांबाज'ची खूप चर्चा होती. या सिनेमाच्या रिलीजआधी 'जांबाज'चं पोस्टर भारत vs पाकिस्तान सामन्यात शारजाह स्टेडियमवर लावण्यात आलं होतं.
'जांबाज'ची चर्चा
भारत vs पाकिस्तान मॅचदरम्यान तुम्हाला व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं असेल तर की स्टेडियममध्ये जागोजागी 'जांबाज' सिनेमाचं पोस्टर झळकण्यात आलेलं. त्यामुळे प्रमोशनची तगडी स्ट्रॅटेजी 'जांबाज'च्या प्रमोशनसाठी वापरली होती. इतकं जोरदार प्रमोशन केल्याने परिणामी सिनेमाला चांगलाच फायदा झाला. 'जांबाज' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला. अनिल कपूर, डिंपल कपाडिया आणि श्रीदेवीच्या या सिनेमाला प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळालं.