Join us

हादरवून टाकणारा 'द रेल्वे मॅन'चा ट्रेलर आला समोर; 'या' दिवशी रिलीज होणार भोपाळ गॅस दुर्घटनेवरील वेब सीरिज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 2:49 PM

भोपाळ गॅस दुर्घटनेवरून प्रेरित बहुचर्चित वेब सीरिज 'द रेल्वे मॅन' धमाकेदार ट्रेलर समोर आला आहे.

 भोपाळ गॅस दुर्घटनेवरून प्रेरि बहुचर्चित वेब सीरिज 'द रेल्वे मॅन' धमाकेदार ट्रेलर समोर आला आहे. नेटफ्लिक्सने 'द रेल्वे मॅन' चा ट्रेलर शेअर केला. 18 नोव्हेंबर रोजी ही वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दिवंगत बॉलिवूड अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खान हा 'द रेल्वे मॅन' वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 

यशराज बॅनरखाली बनलेली 'द रेल्वे मॅन' ही वेबसिरीज भोपाळ गॅस दुर्घटनेच्या सत्य घटनेपासून प्रेरित आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात 1984 मध्ये झालेल्या  गॅस दुर्घटनेत अडकलेल्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घातला होता. त्यांची स्टोरी वेबसीरिजमध्ये पाहायला मिळेल. तर ही वेबसीरिज 4 एपिसोडमध्ये स्ट्रीम केली जाईल. यात आर. माधवन, के के मेनन, दिव्येंदु शर्मा आणि बाबिल खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 भोपाळ गॅस गळती ही भारतातील सर्वांत मोठी औद्योगिक दुर्घटना म्हणून ओळखली जाते. युनियन कार्बाइड नावाच्या कंपनीच्या कारखान्यातून विषारी वायूची गळती झाली. सरकारी आकडेवारीनुसार या दुर्घटनेनंतर काही तासांमध्येच जवळपास 3,000 लोकांचा मृत्यू झाला होता. तो भीषण प्रसंग आठवला की पीडितांचे डोळे अजूनही पाणावतात. 

टॅग्स :नेटफ्लिक्सबॉलिवूडसेलिब्रिटी