Join us

‘हमारे बारह’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 06:45 IST

Hamare Barah Cinema: अन्नू  कपूरच्या ‘हमारे बारह’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. हा चित्रपट १४ जूनला प्रदर्शित होणार होता. न्यायालयाने या चित्रपटावर इस्लामिक धर्माचा आणि विवाहित मुस्लीम महिलांचा अपमान केल्याच्या आरोपांची दखल घेतली आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली.

 नवी दिल्ली - अन्नू  कपूरच्या ‘हमारे बारह’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. हा चित्रपट १४ जूनला प्रदर्शित होणार होता. न्यायालयाने या चित्रपटावर इस्लामिक धर्माचा आणि विवाहित मुस्लीम महिलांचा अपमान केल्याच्या आरोपांची दखल घेतली आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली.

याचिकाकर्ते अझहर बाशा तांबोळी यांच्या बाजूने असलेल्या वकील फौजिया शकील यांच्या युक्तिवादाची दखल घेत न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाला या याचिकेवर जलदगतीने निर्णय घेण्यास सांगितले. खंडपीठाने म्हटले की, आम्ही चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आणि ट्रेलरमधील सर्व आक्षेपार्ह संवाद अजूनही आहे तसेच कायम ठेवण्यात आले आहेत.

टॅग्स :सिनेमाबॉलिवूडन्यायालय