Join us

सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा बनला सुपरस्टार, आहे कोट्यावधींच्या संपत्तीचा मालक तर त्याच्या पत्नीला म्हणतात 'लेडी अंबानी'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 3:25 PM

बॉलिवूडच्या या अभिनेत्याने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

सुनील शेट्टी(Suniel Shetty)ची नव्वदच्या दशकातील बॉलिवूडमधील हिट कलाकारांमध्ये गणना होते आणि आजही त्यांनी आपली फिल्मी कारकीर्द सुरू ठेवली आहे. एक काळ असा होता की सुनील शेट्टीच्या सिनेमांसाठी थिएटरमध्ये लोकांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. सुनील शेट्टीने आपल्या अभिनयाने आणि आपल्या शैलीने लोकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज म्हणजेच ११ ऑगस्ट रोजी सुनील शेट्टी आपला ६२ वा वाढदिवस साजरा करत आहेत.

स्ट्राँग फिजिक असो किंवा त्याची अॅक्शन फिल्म्स किंवा एव्हर ग्रीन त्याचे डायलॉग्स, सुनील शेट्टीने फिल्म इंडस्ट्रीत स्वत:चे नाव कमावले आहे, पण तुम्हाला माहित आहे का की त्याला सुरुवातीपासूनच क्रिकेटर बनायचे होते आणि त्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. आजही त्याची खंत वाटते. आज सुनील शेट्टी हे केवळ चित्रपटांपुरतेच मर्यादित नसून त्याने हॉटेल उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातही आपले नाव कमावले आहे. 

९०च्या दशकातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता

सुनील शेट्टी यांचा जन्म ११ ऑगस्ट १९६१ रोजी कर्नाटकातील मंगळूर येथील मुल्की गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यानंतर त्याचे वडील वीरप्पा शेट्टी यांना त्या शहरात काम मिळत नसल्याने ते कामाच्या शोधात मुंबईत आले. ते एका इमारतीत सफाई कामगार म्हणून काम करू लागले. संपूर्ण कुटुंब जुहू परिसरात राहू लागले. पुढे त्यांचे वडील ज्या ठिकाणी सफाई कामगार म्हणून काम करायचे त्या सर्व इमारती सुनील शेट्टीने विकत घेतल्या. सुनील जेव्हा चित्रपटात काम करायला आला तेव्हा लोकांनी त्याला ही इंडस्ट्री सोडायला सांगितले, पण नशिबात काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते. तर सुनील शेट्टी नव्वदच्या दशकातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून काम करत राहिला.

सुनील शेट्टीचे मुंबईत आहेत दोन रेस्टॉरंटआजच्या काळात सुनील शेट्टी १२५ कोटींचा मालक आहे . खंडाळा हिल पॉइंट येथे त्यांचे एक आलिशान फार्म हाऊस आहे. अभिनयासोबतच सुनील शेट्टी अनेक व्यवसायांचे मालक आहेत. तो पॉपकॉर्न एंटरटेनमेंट प्रायव्हेट या प्रॉडक्शन हाऊसचा मालक आहे आणि तो मुंबईत दोन रेस्टॉरंटही चालवतो. विशेष म्हणजे एक रेस्टॉरंट तेच आहे जे त्यांच्या वडिलांनी सुरू केले होते. आज मुलाने या रेस्टॉरंटला नवा लूक दिला आहे. 

सुनील शेट्टीच्या पत्नीला संबोधलं जातं लेडी अंबानीसुनील शेट्टीच्या पत्नीचे नाव माना शेट्टी आहे. तसे, तिचे खरे नाव मोनिषा कादरी आहे. मानाचे वडील गुजराती मुस्लिम आणि आई पंजाबी हिंदू होती. प्रसिद्धी मिळवण्याआधीच सुनील शेट्टीने १९९१ मध्ये मनासोबत लग्न केले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सुनील शेट्टीच्या पत्नीला कमाईच्या बाबतीत 'लेडी अंबानी' म्हणतात. माना शेट्टी ही रिअल इस्टेटमधील यशस्वी व्यावसायिक मानली जाते. इतकंच नाही तर ती समाजसेविका म्हणूनही काम करते.

टॅग्स :सुनील शेट्टी