साउथचा स्टार महेश बाबू (Mahesh Babu)ने मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत लग्न केले. हे लोकप्रिय कपलपैकी एक कपल आहे. आज नम्रता शिरोडकर(Namrata Shirodakar)चा वाढदिवस आहे. नम्रता शिरोडकर सध्या सिनेजगतापासून दूर असली तरी एकेकाळी तिने अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. नम्रता शिरोडकर सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसली तरी चाहत्यांच्या मनावर आजही ती अधिराज्य गाजविते.
नम्रता शिरोडकरचा जन्म २२ जानेवारी १९७२ साली महाराष्ट्रात झाला. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याआधी ती मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत होती. नम्रताने १९९३ साली मिस इंडियाचा किताब पटकावला आणि मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि टॉप ६ मध्ये आपले स्थान निर्माण केले. यानंतर, त्याच वर्षी, तिने मिस एशिया पॅसिफिक स्पर्धेत भाग घेतला आणि पहिली रनरअप ठरली.
४ वर्ष डेट केल्यानंतर अडकले विवाहबंधनातबॉलिवूडनंतर नम्रताने तेलगू सिनेमात काम केले आणि महेश बाबूसोबत 'वामसी'मध्ये तिने काम केले. वामसीच्या शूटिंगदरम्यान नम्रता आणि महेश बाबूमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर १० फेब्रुवारी २००५ रोजी दोघांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये लग्न केले. नम्रता महेश बाबूपेक्षा साडेतीन वर्षांनी मोठी आहे.लग्नाआधी महेश बाबूने नम्रताला स्पष्ट सांगितले होते की, त्यांची इच्छा आहे की त्यांच्या पत्नीने केवळ घराची जबाबदारी सांभाळावी. महेश बाबूचे हे म्हणणे नम्रताने मान्य केले आणि आपल्या करिअरला अलविदा केला.