Join us  

गावातील महिलेने साडी नेसून 'तौबा तौबा' गाण्यावर केलेला डान्स व्हायरल; विकी कौशल म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 1:32 PM

विकी कौशलच्या गाजलेल्या तौबा तौबा गाण्यावर गावातील महिलेने मुलांसोबत कमाल डान्स केलाय. त्यावर विकीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत (vicky kaushal, tauba tauba)

विकी कौशलच्या 'बॅड न्यूज' सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमातलं 'तौबा तौबा' गाणं सध्या चांगलंच गाजतंय. हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतंय. अनेकांनी यावर रील व्हिडीओ करत चांगलीच प्रसिद्धी मिळाली. याच 'तौबा तौबा' गाण्यावर गावातील एका महिलेने केलेला रील व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओखाली विकीने केलेली कमेंट चर्चेत आहे.

गावातील महिलेच्या डान्स रीलवर विकीची कमेंट

रुपाली सिंग नावाच्या कंंटेंट क्रिएटरने विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्यावर डान्स केलाय. पिवळी साडी नेसून या महिलेने तिच्या दोन मुलांसोबत कमाल डान्स केलाय. विकीच्या डान्स स्टेप्स या महिलेने हुबेहूब कॉपी केल्यात. इतकंच नव्हे तिच्या दोन मुलांनीही तिला साथ दिलीय. शेवटी तिचा नवरा सायकल घेऊन येताना दिसतो. तो सुद्धा पत्नी आणि दोन मुलांचा डान्स पाहून आश्चर्यचकीत झालेला दिसतो. महिलेच्या या डान्स व्हिडीओखाली विकीने 'वॉव' अशी कमेंट करुन तिला दाद दिलीय.

महिलेचा व्हिडीओ झाला तुफान व्हायरल 

विकी कौशलच्या या फॅनचा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. या व्हिडीओला ४६.७ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय तब्बल २६ लाख लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं असून ४८ हजार लोकांनी कमेंट केल्या आहेत. रुपाली सिंग ही गावात राहणारी महिला असून तिचे सोशल मीडियावरील डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. 'तौबा तौबा' गाणं हे विकी कौशल-तृप्ती डिमरीच्या 'बॅड न्यूज' सिनेमातलं गाणं असून हे गाणं आणि सिनेमा लोकांना आवडल्याचं दिसतंय.

टॅग्स :विकी कौशलतृप्ती डिमरीनृत्य