Join us  

सलमान खानच्या 'सिंकदर'मधील व्हिलन आला समोर, आहे 'बाहुबली'शी कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 4:43 PM

Salman Khan : सलमान खानच्या 'सिकंदर'मध्ये खलनायकाची एन्ट्री झाल्याची मोठी अपडेट समोर आली आहे.

यावर्षी सलमान खान(Salman Khan)चा एकही चित्रपट नाही. पण जेव्हापासून त्याने आगामी 'सिकंदर' या चित्रपटाची घोषणा केली आहे तेव्हापासून चाहते रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना हिची एंट्री झाली. ज्यामुळे चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. आता सिकंदरला बाहुबलीचे कनेक्शन मिळाले आहे. खरं तर, एक नवीन अपडेट समोर आली आहे की, बाहुबलीमध्ये कटप्पाची भूमिका साकारणारा अभिनेता सत्यराज दिसणार आहे. 

सिंकदर चित्रपटात नुकतीच रश्मिका मंदानाची एन्ट्री झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता चित्रपटातील खलनायकाची एन्ट्री झाली आहे. या चित्रपटात बाहुबलीमध्ये कटप्पाची भूमिका साकारणारा अभिनेता सत्यराजची एन्ट्री झाली आहे. पत्रकार आणि निर्माती चित्रा लक्ष्मणन यांनी ही माहिती दिली आहे.

ए आर मुरुगादास करणार 'सिकंदर'चे दिग्दर्शन सुपरस्टार सलमान खानच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन तमिळ चित्रपट निर्माते ए आर मुरुगदास करणार आहेत. दिग्दर्शक ए आर मुरुगादास यांनी सुरिया स्टारर 'गजनी' चित्रपटाची निर्मिती केली होती. याशिवाय त्यांनी रजनीकांतचा 'दरबार' आणि 'थुपुक्की' हे ब्लॉकबस्टर चित्रपट केले आहेत. आता दिग्दर्शक एआर मुरुगदास सुपरस्टार सलमान खानसोबत एक चित्रपट करणार आहेत. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्सुकता आहे. साजिद नाडियादवाला या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. निर्माते हा चित्रपट पुढच्या वर्षी ईद २०२५ ला रिलीज करणार आहेत.

टॅग्स :सलमान खानरश्मिका मंदाना