ठळक मुद्देएकता मुलाच्या नावासंबंधीत एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे''मी आणि शोभा खूप आनंदी आहोत''
निर्माती एकता कपूर सरोगसीद्वारे आई झाली आहे. गत २७ जानेवारीला एकता कपूर आई बनली. तिचा मुलगा एकदम स्वस्थ असून लवकरच तो एकताच्या घरी येईल, असे कळतेय. एकता मुलाच्या नावासंबंधीत एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एकताने सांगितले ती मुलाचे नाव रवि ठेवतेय. एकता आणि तुषार कपूरचे वडील जितेंद्र यांचे नावदेखील रवि होते त्यानंतर त्यांनी ते बदलून जितेंद्र केले.
जितेंद्र यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले, याआधी मी दादा झालो होता आणि नानासुद्धा झालो. रविच्या जन्माने आमचे कुटुंब पूर्ण झाले. पुढे ते म्हणाले, की आम्ही पत्रिकेनुसार नाव ठेवले आहे. त्याच्या नावाचे पहिले अक्षर 'र' आले होते मग एकताने विचार केला बाबांचे नाव का ठेवू नये?, मी आणि शोभा खूप आनंदी आहोत आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे, आता आम्ही त्याच्या घरी यायची वाट पाहत आहोत.''
तीन वर्षांपूर्वी तुषार कपूर सरोगसीद्वारे पापा बनला होता. त्याच्या मुलाचे नाव लक्ष्य आहे. काही दिवसांपूर्वी एकताने लग्न न करता आई बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. बाळाची जबाबदारी उचलण्यास मी एकदम तयार आहे. पण लग्नाचा मात्र माझा विचार नाही, असे एकता म्हणाली होती.
एकताला टीव्ही इंडस्ट्रीची ‘क्वीन’ म्हणून ओळखले जाते. १९९५ मध्ये टीव्ही आलेल्या एकता कपूर निर्मित ‘हम पांच’ या मालिकेने लोकप्रीयतेचा कळस गाळला. महिला गँगची ही मालिका लोकांना प्रचंड आवडली. एकताने चाळीशी ओलांडली आहे आणि आजपर्यंत तिने ४० पेक्षा अधिक मालिका व चित्रपट प्रोड्यूस केले आहेत. तिच्या नावावर २० पेक्षा अधिक हिट मालिका आहेत. पण हम पांच , क्यों की सांस भी कभी बहू थी , कसौटी जिंदगी की , कहानी घर घर की आणि नागीन या पाच मालिकांनी एकताला ‘टीव्हीची क्वीन’ बनवले.