बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. त्यात तिने नुकतेच मुंबईला पीओके म्हटल्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. त्यात आता कंगना आणि महाराष्ट्र सरकार असा सामना रंगला आहे. तसेच महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाची ड्रग्स टेस्ट केली जाणार असे म्हटले. यासाठी शेखर सुमनचा मुलगा म्हणजेच अभिनेता अध्ययन सुमनच्या मुलाखतीचा आधार घेतला आहे. अध्ययनने कंगनावर बरेच आरोप केले होते. यावर आता कंगनाने चुप्पी तोडत म्हटले की जर तिचा ड्रग्स कनेक्शनचा काही पुरावा मिळाला तर ती मुंबई सोडून जाईन.
कंगना राणौत हिने ट्विटरवर म्हटले की, मी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या उपकारामुळे खूप खूश आहे. कृपया माझी टेस्ट करा. माझे कॉल रेकॉर्ड तपासा. जर तुम्हाला ड्रग पेडलरसोबत माझी कोणती लिंक मिळाली तर मी माझी चूक स्वीकारेन आणि कायमची मुंबई सोडून देईन. तुम्हाला भेटण्याची वाट पाहत आहे.
अध्ययन सुमनचा आरोप- कंगना मला मारत होतीअध्ययन सुमनने डीएनएला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, एका पार्टीत कंगनाने मला जोरात मारले तर मी रडू लागलो. नंतर मला कारमध्ये मारहाण केली. ती रात्र मी कधीच विसरू शकत नाही. मी तिला घरी सोडले तर तिने सँडल फेकून मारली. माझा फोन भिंतीवर आपटून तोडून टाकला. कंगनाने मला घरी बोलवून तिच्या चांगल्या करियरसाठी पूजा केली आणि रात्री बारा वाजता काही गोष्टी स्मशानभूमीत फेकायला लावल्या.
मनालीहून मुंबईसाठी कंगना रवानाकंगनाच्या कार्यालयामध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप मुंबई महापालिकेने केला आहे. आजच तिच्या ऑफिसवर नोटीस चिकटविण्यात आली आहे. यामध्ये काय काय अवैध बांधकाम केले याचे फोटोही दिले आहेत. यातच बीएमसीने कंगनाला कायदा कलम 354(A) नुसार घरातून काम करू शकत नसल्याची नोटीस पाठविली आहे. तसेच पुढील 24 तासांत कंगनाला ऑफिसच्या रिन्यूएशनचे सारे कागदपत्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी कंगनाकडे उद्या सकाळी 10 वाजेपर्यंतच वेळ आहे. कंगनाने 9 सप्टेंबरला मी मुंबईत येत असून हिम्मत असेल तर हात लावून दाखवा, असे आव्हान दिले होते. मात्र, कंगनाने महापालिकेची कारवाई पाहून एक दिवस आधीच निघण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने विमानसेवा पुरविणाऱ्या हेलिकॉप्टर, चार्टर प्लेनसाठीही प्रयत्न करून पाहिले.