Join us

तेव्हापासून सलमान खानने चित्रपट किसिंग सीन देणे बंद केले !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 9:00 AM

बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये रोमांस किंवा किसिंग सीन देणे ही कोणत्याही अभिनेत्यासाठी किंवा अभिनेत्रीसाठी सामान्य गोष्ट आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान, ...

बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये रोमांस किंवा किसिंग सीन देणे ही कोणत्याही अभिनेत्यासाठी किंवा अभिनेत्रीसाठी सामान्य गोष्ट आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि चॉकलेट बॉय रणबीर कपूर यांना आपण पडद्यावर किसिंग सीन देताना अनेक वेळा पाहिले आहे. मात्र बॉलिवूडच्या दबंग खानला अर्थाच सलमान खानला तुम्ही पडद्यावर कधीच किसिंग सीन्स देताना पाहिले नसले. सलमान आपल्या चित्रपटातील हिरोन्ससोबत भरपूर रोमान्स करताना दिसतो मात्र तो कधीच त्यांना किस करताना दिसत नाही. सलमान चित्रपटात किसिंग सीन का देत नाही यामागेच कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.    'मैने प्यार किया' हा चित्रपट सलमान खानच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला खरा. मात्र या चित्रपटाच्या वेळी असे काही घडले की यानंतर सलमानने कधीच ऑनस्क्रिन किसिंग सीन दिला नाही. या चित्रपटात सलमानला भाग्यश्रीला किस करायचे होते मात्र तो त्यासाठी तिने नाकारला दिला. शेवटी निर्मात्यांनी दोघांमध्ये एक काच ठेवून कसा बसा हा सीन पूर्ण केला. त्यानंतर सल्लू मियाँने चित्रपटात किसिंग सीन कधीही न देण्याचा निर्णय घेतला. एका इंटरव्ह्युमध्ये सलमान किसिंग सीन न देण्याबाबतचा खुलासा केला होता.  सलमान म्हणाला होता की, बऱ्याचवेळेला मी कुटुंबीयांसोबत बसून चित्रपट बघत असतो. हॉलिवूडचे चित्रपट बघताना इंटिमेट किंवा एखादा किसिंग सीन आला तर त्यानंतर तिथे बसलेला प्रत्येक जण अनकंम्फर्टेबल होऊन जातात. त्यामुळे मी कधीच चित्रपट किसिंग सीन देत नाही. सलमानने त्यावेळी घेतलेल्या निर्णयावर तो आज ही कायम आहे. चित्रपटाची कथा वाचल्यानंतर तो मेकर्सना स्पष्टपणे सांगतो की चित्रपटात किसिंग सीन नसावा. ALSO READ :  GOOD NEWS !! ​बॉलिवूडमध्ये जायचेयं तर सलमान खानला पोर्टफोलिओ पाठवा!!सलमानने नुकतेच आपला आगामी चित्रपट 'टायगर जिंदा है'चे शूटिंग पूर्ण केले आहे. यात त्याच्यासोबत कॅटरिना कैफ ही झळकणार आहे. आबुधाबीमध्ये या चित्रपटाचे 45 दिवसांचे शूटिंग करण्यात आले आहे. ख्रिसमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खानचे फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.