रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोन हे बॉलीवुडमधील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर कपल आहे. या कपलचे फॅन फॉलोविंग देखील जबरदस्त आहे. त्यांचे चाहते त्यांना सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्म्सवर पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. यातच आता, 'दीपवीर'च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आपण लवकरच पत्नीसोबत (दीपिका) एक चित्रपट करणार असल्याचे संकेत रणवीर सिंहने दिले आहेत.
रणवीर सिंहने नुकताच FICCI फ्रेम्स 2022 मध्ये भाग घेतला होता. यावेळी त्याने अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्याला दीपिकासोबत असलेल्या संबंधांसंदर्भातही प्रश्न विचारण्यात आला होता. विशेष म्हणजे, यावेळी त्याचे चाहते त्यांना पुन्हा एकदा एकत्रितपणे ऑनस्क्रीन पाहण्यासाठीही उत्सूक असल्याचे दिसून आले. यापूर्वी, हे कपल '83' मध्ये क्रिकेटर कपिल देव आणि त्यांची पत्नी रोमी देव यांच्या रुपात दिसले होते. लग्नानंतरची ही त्यांची पहिलीच ऑनस्क्रीन भूमिका होती. यावेळी प्रश्नांच्या उत्तरावर बोलताना रणवीर म्हणाला, आपल्याला लवकरच पत्नी दीपिका सोबत झलक दिसेल. तसेच, हे एक 'स्वीट सरप्राइज' असेल.
रणवीर म्हणाला, आम्ही दोघे एकमेकांना भेटलो आणि 2012 मध्ये डेट करायला सुरुवात केली. यामुळे 2022, मला आणि दीपीकाला दहा वर्ष झाली आहेत. मी तिची अत्यंत प्रशन्सा करतो. याशिवाय माझ्याकडे आणखी काही नाही. मी माझ्या वैयक्तीक आयुष्यातही दीपिकाकडून खूप काही शिकले आहे. हे सर्वांसाठीच एक स्वीट सरप्राइज असते. आपण लवकरच आम्हा दोघांना एकत्र पाहाल. मी माझ्या आयुष्यात तिचा अत्यंत आभारी आहेरणवीर नेहमीच दीपिकाचं कौतुक करताना दिसतो -रणवीर आणि दीपिकाचे चाहते सोशल मिडियाच्या माध्यमाने त्यांच्यावर प्रेमाचा प्रचंड वर्षाव करताना दिसतात. नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर अवॉर्डदरम्यान, सर्वोत्कृष्ट अभिनेत्या पुरस्कार मिळाल्यानंतर, रणवीरने त्याच्या या यशाचे संपूर्ण श्रेय पत्नी दीपिकाला दिले. 'माझ्या यशाचे रहस्य माझी पत्नी आहे,' असे रणवीर सिंहने म्हटले होते.
Deepika Padukone आणि Ranveer Singh यांचे लग्न 2018 मध्ये झाले आहे. यापूर्वी ते जवळपास 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. चित्रपटांसंदर्भात बोलायचे झाल्यास, दीपिका पदुकोण आगामी काळात शाहरुख खानसोबत ‘पठाण’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच हृतिकसोबत ‘फायटर’मध्येही दिसणार आहे. याशिवाय रणवीर सिंह रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ मध्ये, तसेच, करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मध्ये दिसणार आहे.