ठळक मुद्देमलायका अर्जुनसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे मलायका आणि अर्जुन 18 ते 22 एप्रिलच्या दरम्यान लग्न करु शकतात.
गेल्या अनेक महिन्यांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा त्यांच्या अफेअरला घेऊन चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी मलायका मालदीवमध्ये आपल्या गर्ल गँग सोबत व्हॅकेशन एन्जॉय गेली होती. अर्जुनसुद्धा या ट्रीपमध्ये जॉईन झाला होता. रिपोर्टनुसार मलायकाची ही लग्ना आधीची बॅचलर पार्टी होती. लवकरच मलायका अर्जुनसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मात्र मलायकाने या सगळ्या गोष्टी निवळ अफवा असल्याचे सांगितले आहे.
लेटेस्ट रिपोर्टनुसार मलायका आणि अर्जुन 18 ते 22 एप्रिलच्या दरम्यान लग्न करु शकतात. मिळालेल्या माहितीनुसार हे लग्न गोव्यात होणार आहे. जिथं दोघांचे कुटुंबीय उपस्थित असणार आहेत. दोघांनी आपल्या मित्रपरिवाराला या तारखा फ्री ठेवण्यास सांगितले आहे. तसेच त्यांचे हेअर स्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट यांनी लग्नाच्या तयारीबद्दल कोणालाही सांगायचे नाही अशी ताकीद त्यांना देण्यात आली असल्याची माहिती आहे.
बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मलायका म्हणाली, या सर्व चर्चांमध्ये काहीच तथ्य नाही. तरीही करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये मलायकाने प्रेमाची अप्रत्यक्षपणे कबुली दिली होती. तर या आधी अर्जुन कपूरनेदेखील याच चॅट शोमध्ये अप्रत्यक्षपणे लग्नाचेही संकेत दिले होते.
शोचा होस्ट करण जोहरने अर्जुनला त्याच्या रिलेशनशिप स्टेट्सविषयी प्रश्न विचारला असता मी सिंगल नाही, असे अर्जुन म्हणाला होता. अर्जुनच्या या उत्तराने त्याची बहीण जान्हवी कपूरलादेखील आश्चर्याचा धक्का बसला आहे.