व्यावसायिक आणि कलात्मक चित्रपट असं काही नसतं -काजोल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2016 3:51 PM
‘मुख्य प्रवाहातील व्यावसायिक चित्रपट आणि कलात्मक चित्रपट असं काही नसतं. आम्ही केवळ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी चित्रपट बनवतो, हे मत आहे ...
‘मुख्य प्रवाहातील व्यावसायिक चित्रपट आणि कलात्मक चित्रपट असं काही नसतं. आम्ही केवळ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी चित्रपट बनवतो, हे मत आहे काजोलचे. अलीकडे एका इव्हेंटमध्ये ‘दिलवाले’ फेम काजोलने हे परखड मत मांडले. थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या नजरा केवळ आमच्यावर आणि आमच्या अभिनयावर खिळलेल्या असतात. याऊपरही कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपट अशी मानसिकता दिसते.‘बी टाऊन’मधील या दोन प्रवाहांमध्ये तुलना करणारी ही मानसिकता संपायला हवी. कारण त्याचा कलाकारांवर प्रचंड वाईट प्रभाव पडतो. मी स्वत: या विचारसरणीच्या पूर्णपणे विरोधात आहे. माझ्या मते, चित्रपटांचे केवळ आणि केवळ चांगले चित्रपट आणि वाईट चित्रपट असेच वर्गीकरण करता येईल,’असे ती म्हणाली. ‘शिप आॅफ थिसस’चा दिग्दर्शक आनंद गांधी याच्यासोबत काजोलने एक चित्रपट साईन केलाय. या चित्रपटाचा दिग्दर्शक अजय देवगन असेल. चित्रपट संकल्पनेच्या सौंदर्याबद्दल बोलताना ती म्हणते,‘सध्याचे प्रेक्षक हे खुप हुशार आहेत. त्यांना कोणता चित्रपट चांगला, कोणता वाईट हे कळू लागलयं. इंटरनेट,सोशल मीडिया यामुळे तर सध्याचा प्रेक्षक अधिक प्रगल्भ झालायं.