बॉलिवूड अभिनेत्री सुमन रंगनाथन तुम्हाला आठवत असेल ना. जिने १९९६ साली फरेब चित्रपटातून बॉलिवूडमधील कारकीर्दीला सुरूवात केली होती. सुमनचा पहिला चित्रपट त्या सालातील सर्वात हिट चित्रपट होता. या चित्रपटात सुमनसोबत फराज खान, मिलिंद गुणाजी मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाची कथा आणि गाणी प्रेक्षकांना खूप भावली होती. विशेष करून या चित्रपटातील गाणे 'ये तेरी आंखे झुकी झुकी' आजही हिट गाण्याच्या यादीत आहे.
खरेतर सुमन रंगनाथनचा फरेब हा पहिला चित्रपट नाही तर कन्नड चित्रपट सीबीआय शंकर होता. फरेब चित्रपटानंतर सुमनचे करिअर दुसऱ्या हिटसाठी तरसत राहिले, पण सुमनच्या नावाची चर्चा तिच्या नावामुळे नाही तर पर्सनल लाइफमुळे जास्त चर्चेत आले होते.
फार कमी लोकांना माहित आहे की चित्रपटात येण्यापूर्वी सुमन मॉडेलिंग करत होती. त्यावेळी तिचे फरहान अख्तरवर प्रेम जडले होते. वृत्तांनुसार, सुमनला पहिल्याच नजरेत फरहानवर प्रेम जडले होते. मात्र फरहानला त्या वयात कोणत्याच नात्यात अडकायचे नव्हते. त्यामुळे सुमनला फरहानपासून वेगळे होणे योग्य वाटले. फरहानपासून वेगळे झाल्यानंतर जेव्हा तिने बॉलिवूडमधील करिअरला सुरूवात केली होती, तेव्हा तिचे नाव अभिनेता राहुल रॉयसोबत जोडले गेले होते. इतकेच नाही तर सुमन आणि राहुलला लग्नदेखील करायचे होते. मात्र दोघांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. असे सांगितले जाते की राहुलने त्या दिवसांमध्ये तिची खूप मदत केली होती.
त्यानंतर सुमन रंगनाथनचे अफेयर इंडस्ट्रियलिस्ट उरू पटेलसोबत होते पण हे नातेदेखील जास्त काळ टिकू शकले नाही. सुमन आणि उरूच्या नात्याचा अंत फार कटुतेत झाला. त्यानंतर २००० साली तिने प्रसिद्ध मॉडेल गौतम कपूरसोबत लग्न केले. मात्र तिच्या रिलेशनशीपप्रमाणे त्यांचे लग्न टिकू शकले नाही आणि दोघे विभक्त झाले.
गौतमसोबत विभक्त झाल्यानंतर सुमनने बंटी वालियासोबत २००६मध्ये लग्न केले. मात्र लग्नाच्या काही महिन्यांनंतर एका पार्टीत दोघांमध्ये खूप भांडणे झाले. तेव्हापासून ते वेगळे राहू लागले होते.