बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले आहे. या प्रकरणाचा आता सीबीआय, एनसीबी आणि ईडी या तीन एजेंसी तपास करत आहेत. त्यात या प्रकरणी दररोज नवीन माहिती समोर येत आहे. यात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीने कारवाई करत सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला व तिचा भाऊ शोविकला अटक केली. दरम्यान आता सुशांतच्या बँक अकाउंटचा तपशील समोर आला आहे. ज्यातून काही गोष्टींचा पर्दाफाश झाला आहे.
झी न्यूजच्या रिपोर्टनुसार, बॉलिवूडमधील कारकीर्दीतून सुशांत सिंग राजपूतने जवळपास ६० कोटी रुपये कमविले होते. त्याच्या या बँक खात्यावर नॉमिनी त्याची बहिण प्रियंका आहे. सुशांतने अंकिता आणि स्वत:च्या नावे जवळपास ३ कोटींचा प्लॉट खरेदी केला होता. मृत्यूसमयी त्याच्या खात्यावर अडीच ते तीन कोटी रुपये शिल्लक होते.
'छिछोरे'च्या पार्टीत केला ४० हजारांचा खर्चबँक अकाउंटच्या स्टेटमेंटमधून समोर आलेल्या माहितीनुसार २८ मार्च २०१९ ला सुशांतच्या पावना फार्म हाऊसवर 'छिछोरे' या चित्रपटाची सक्सेस पार्टी झाली होती. ज्यासाठी सुशांतने ४० हजार रुपये खर्च केल्याचे समजते आहे. एनसीबीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा वापर केला होता.
आणखीन एका अभिनेत्रीचं नाव येऊ शकत समोरसारा अली खान शिवाय आणखीन एका अभिनेत्रीची ड्रग्स प्रकरणात सहभागी असल्याची शक्यता आहे. या पार्टीत आणखीन एका अभिनेत्रीने ड्रग्सचे सेवन केले होते. रिया चक्रवर्ती आणि दीपेश शाह यांनी एनसीबीला चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीमध्ये या अभिनेत्रीच्या नावाचा खुलासा केला आहे. त्यामुळे येत्या काळात या अभिनेत्रीचेही नाव समोर येण्याची शक्यता आहे.
सुशांत प्रकरणात नवीन खुलासा, रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकचं सीक्रेट चॅट आलं समोर
ड्रग्स पेडलर्सचे इंटरनॅशनल कनेक्शन सुशांत प्रकरणात एनसीबीला ड्रग्स पेडलर्सचे इंटरनॅशनल कनेक्शनदेखील समोर आले आहे. आतापर्यंतच्या तपासात एनसीबीला माहिती मिळाली होती की यात अनुज केशवानी आणि करमजीत इंटरनॅशनल ड्रग्स पेडलर्सच्या संपर्कात होते. यातील एकाने २०१७ साली श्रीलंकामध्ये आयोजित केलेल्या सर्वात मोठ्या रेव्ह पार्टीमध्ये भाग घेतला होता. ही माहिती मिळाल्यानंतर आता एनसीबी इंटरनॅशनल कनेक्शनचाही तपास करत आहेत.
सुशांतचा व्हिसेरा अहवाल आठवडाभर लांबणीवर!अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या व्हिसेराचा अहवाल आठवडाभर लांबणीवर पडला आहे. अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था (एम्स) पुढील आठवड्यात तो सीबीआयकडे सादर करेल. या प्रकरणी तपास पथकातील फॉरेन्सिक एक्स्पर्टसमवेत संचालक मंडळाची बैठक होईल. यात अहवालाचा अंतिम निष्कर्ष नोंदविला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
सुशांतचा व्हिसेरा अहवाल आठवडाभर लांबणीवर! सीबीआय, सीएफएसएलची संयुक्त बैठक होणार
सीबीआयची टीम परतली दिल्लीलागेला महिनाभर मुंबईत तळ ठोकून असलेले सीबीआयचे पथक बुधवारी दिल्लीला परतले. शेकडो तासांचा तपास व अनेकांकडे कसून चौकशी करूनही सुशांतची हत्या झाली, याबाबत एकही पुरावा मिळू शकेला नाही. त्यामुळे त्याला कट करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आले का, याच अंगाने तपासावर भर दिला जात आहे. त्यासाठी सुशांतचा व्हिसेरा पुन्हा तपासण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्या पोटात विषाचा अंश होता का, याची पडताळणी केली जाईल.