झिरो फिगरचा ट्रेंड मोडीत काढणारी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे विद्या बालन (Vidya Balan). कोणत्याही गॉडफादरशिवाय विद्याने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सशक्त आणि दमदार अभिनयामुळे चर्चेत येणाऱ्या विद्याने आजवरच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. 2005 मध्ये आलेला 'परिणीती' हा त्यापैकीच एक.
'परिणीता' हा चित्रपट शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या बंगाली कादंबरीवर आधारित होता. विद्या बालन, संजय दत्त, सैफ अली खान, रायमा सेन, दिया मिर्झा यांसारख्या स्टार्सनी सजलेल्या या चित्रपटाची छाप आजही कायम आहे. विद्या बालनला चित्रपटात मुख्य भूमिका मिळवण्यासाठी अनेक वेळा स्क्रीन टेस्टला जावे लागले, त्यानंतरच तिला हा चित्रपट मिळाला. 'लोलिता'च्या भूमिकेतील तिचा अभिनयाने सर्वांची मनं जिंकली होती.
विद्या बालनच्या कारकिर्दीतील हा पहिलाच चित्रपट होता, जो जबरदस्त हिट ठरला. हा चित्रपट मिळवण्यासाठी तिला ६० वेळा स्क्रीन टेस्ट द्यावी लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात 'लोलिता'ची भूमिका विद्या बालनने नाही तर ऐश्वर्या राय बच्चन किंवा राणी मुखर्जीने साकारायची होती. दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनीही या दोन्ही अभिनेत्रींशी संपर्क साधला होता.जेव्हा काही जमले नाही तेव्हा 'लोलिता'च्या भूमिकेसाठी विद्या बालनची निवड करण्यात आली. . विधू विनोद चोप्रा यांना या चित्रपटात सैफ अली खानला कास्ट करण्याची इच्छाही नव्हती. विद्या लवकरच नियत या क्राइम थ्रिलर सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शक अनु मेनन करत आहेत. या सिनेमात विद्यासोबत राम कपूर, राहुल बोस, नीरज काबी, शहाना गोस्वामी, अमृता पुरी, दीपन्निता शर्मा आणि निक्की वालिया ही स्टारकास्ट झळकणार आहे.