Join us

‘या’ 5 अभिनेत्रींचा घटस्फोट होऊनही जगत आहेत सुखी आयुष्य !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 1:00 PM

काही तारका अशाही आहेत ज्यांचा घटस्फोट होऊन बराच काळ झाला तरीही त्यांनी दुसरे लग्न केले नाही आणि विशेष म्हणजे त्या आपल्या आयुष्यात सुखीदेखील आहेत. जाणून घेऊया त्या अभिनेत्रींबाबत...

ठळक मुद्देबॉलिवूड मध्ये डेटिंग, फ्रेंडशिप, लव्ह, अफेअर, लग्न आणि त्यानंतर घटस्फोट ह्या गोष्टी घडतच असतात. घटस्फोट झाल्यानंतर बरेचजण एक-दोन वर्षानंतर दुसऱ्या जोडीदाराशी लग्न देखील करतात.काही तारका अशाही आहेत ज्यांचा घटस्फोट होऊन बराच काळ झाला तरीही त्यांनी दुसरे लग्न केले नाही.

-रवींद्र मोरेबॉलिवूड मध्ये डेटिंग, फ्रेंडशिप, लव्ह, अफेअर, लग्न आणि त्यानंतर घटस्फोट ह्या गोष्टी घडतच असतात. घटस्फोट झाल्यानंतर बरेचजण एक-दोन वर्षानंतर दुसऱ्या जोडीदाराशी लग्न देखील करतात. मात्र काही तारका अशाही आहेत ज्यांचा घटस्फोट होऊन बराच काळ झाला तरीही त्यांनी दुसरे लग्न केले नाही आणि विशेष म्हणजे त्या आपल्या आयुष्यात सुखीदेखील आहेत. जाणून घेऊया त्या अभिनेत्रींबाबत...* पूजा भट्ट

दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी आणि चुलबूली अभिनेत्री आलिया भट्टची मोठी बहीण पूजा भट्ट आहे. पूजाने आपल्या काळात अनेक हिट चित्रपट देत बºयाचजणांच्या मनांवर राज्य केले आहे. अभिनय क्षेत्रात नावाजलेल्या पूजाचे व्यक्तिगत आयुष्य मात्र खूपच चढउताराचे ठरले आहे. पूजाने २००३ मध्ये मनीष मखिजा सोबत लग्न केले होते. मात्र ११ वर्षाच्या सहवासानंतर दोघेही वेगळे झाले. आज पूजा एकटीच आहे, मात्र तरीही तिचे आयुष्य ती तिच्या पद्धतीने सुखाने जगत आहे.* मनीषा कोईराला

बॉलिवूड मध्ये खोडकर आणि निरागस व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या मनीषा कोईरालाने अनेक सुपरहिट चित्रपट देत चाहत्यांचे तुफान मनोरंजन केले आहे. मनीषाचे सौंदर्य आजही अबादीत आहे. मनीषाने २०१० मध्ये उद्योगपती सम्राट दहाल सोबत लग्न केले होते. मात्र हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही आणि दोघेही वेगळे झाले. मनीषाला कॅन्सर आजारानेही ग्रासले होते. मात्र तरीही ती डगमगली नाही आणि आज एकटी असूनही ती आनंदी आहे.* ममता कुलकर्णी

एकेकाळी बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळवणाºया ममताने माफिया विकी गोस्वामीसोबत लग्न केले होते. लग्नानंतर मात्र ती बॉलिवूड पासून लांब राहिली. आत्ता ड्रग्स च्या अवैद्य धंद्यामुळे विकी गोस्वामी जेल मधे आहे. आणि ममता एकटीच साध्वी बनून आपले आयुष्य जगते.* करिश्मा कपूर

करिश्मा कपूरने आपल्या काळात बॉलिवूडमध्ये दबदबा निर्माण केला होता. करिश्माचे लग्न २००३ मध्ये उद्योगपती संजय कपूरसोबत झाले होेते. मात्र २०१६ मध्ये घटस्फोट घेत ती एकटी जीवन जगू लागली. आता अशा चर्चा आहेत की, करिश्मा पुन: लग्न करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्टनुसार करिश्मा संदीप तोषनिवालला डेट करते आहे आणि कदाचित लवकरच ती विवाह बंधनात अडकू शकते.* सुजैन खान

सुजैन खान आणि ऋतिक रोशन २००० मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले होते. मात्र त्यांनी २०१४ मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटाची बातमी ऐकून बरेचजण चकित झाले होते. १४ वर्षाच्या सहवासानंतर हे दोघेही का वेगळे झाले याचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही. सुजैनला घटस्फोट घेऊन ५ वर्ष झाली आणि ती आनंदी व सुखी जीवन जगत आहे.

टॅग्स :बॉलिवूड