बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे लाखो चाहते आहेत. त्याचा अभिनय आणि त्याची स्टाईल सगळ्यांना आवडते. सलमानने माधुरीपासून प्रियंकापर्यंत जवळपास सर्वच अभिनेत्रींसोबत काम केले आहे. पण, काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी सलमान खानसोबत ऑफर केलेले चित्रपट नाकारले आहेत. तर काहींना सलमान खानसोबत काही चित्रपट केल्यानंतर पुन्हा त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करण्यास नकार दिला.
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सलमान खानसोबत फक्त एकाच चित्रपटात दिसली होती. 'जानम समझा करो' असे या चित्रपटाचे नाव होते. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करु शकला नाही. त्यानंतर उर्मिला मातोंडकर आणि सलमान खान ही जोडी पुन्हा पडद्यावर पाहायला मिळाली नाही.
ट्विंकल खन्ना
ट्विंकल खन्ना आणि सलमान खान हे दोघेही 'जब प्यार किसी से होता है' या चित्रपटात एकत्र दिसले आहेत. त्यानंतर ही जोडी कधीच एकत्र दिसली नाही.
सोनाली बेंद्रे
'हम साथ साथ है'मध्ये सोनाली बेंद्रे आणि सलमान खानची जोडी खूपच सुंदर दिसत होती. मात्र या चित्रपटानंतर दोघांनी एकत्र काम केले नाही. काळवीट प्रकरणानंतर सोनाली बेंद्रेने सलमान खानला दूर केल्याचे बोलले जात आहे.
ऐश्वर्या राय
ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्यातील वाद तर सर्वश्रुत आहे. 'हम दिल दे चुके सनम'च्या शूटिंगपासून दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. पण लवकरच ब्रेकअप झाले. त्यानंतर दोघांनी पुन्हा एकत्र काम केले नाही.
दीपिका पादुकोणने तर या बाबतीत एक वेगळा विक्रम केला आहे. तिने सलमान खानसोबतचा चित्रपट करण्यास एकदा नाही तर सहा वेळा नकार दिलाय. यामध्ये किक, बजरंगी भाईजान, सुलतान यांसारख्या हिट चित्रपटांचाही समावेश असल्याचे म्हटले जाते. इतकेच नाही तर दीपिका पादुकोणला सलमान खानसोबतचा पहिला चित्रपटही ऑफर झाला होता. पण तेव्हा दीपिका पादुकोण मॉडेलिंग जग सोडायला तयार नव्हती. त्यामुळे तिने नकार दिला होता. त्यानंतर दीपिका पादुकोण आणि सलमान खान यांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली नाही.