घर आणि करिअर या दोन्हींची जबाबदारी लीलया सांभाळणा-या अनेक महिला आपल्या अवती-भवती आहेत. बॉलिवूडही याला अपवाद नाही. बॉलिवूडमध्येही करिअर आणि कुटुंब यांचे संतुलन साधणा-या अनेक ‘यम्मी सुपरमॉम्स’ आहेत. ऐश्वर्या राय बच्चन, काजोल, करिना, जेनेलिया या यादीत अनेकींची नावे घेता येतील. केवळ अभिनयच नाही तर त्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी लागणारे ग्लॅमर, फॅशन सेन्स अशा सगळ्या गोष्टी या सुपरमॉम्स आघाडीवर आहेत. अशाच काही यम्मी सुपरमॉम्सविषयी...करिना करिना कपूर लवकरच म्हणजे येत्या डिसेंबरमध्ये आई होणार आहे. सध्या ती पे्रग्नंसी एन्जॉय करतेय. खरे तर बेबी बम्प दाखवायला अभिनेत्री धजावत नाहीत. पण करिना अगदी बिनधास्तपणे वेगवेगळ्या स्टाईल स्टेटमेंट्ससह अगदी अभिमानाने बेबी बम्प मिरवते आहे. प्रेग्नंसीमधील एक स्टाईल स्टेटमेंट तिने सेट केला आहे. करिनाच्या फॅशन सेन्सला तोड नाही. तिला बॉलिवूडमधील सगळ्यांत हॉट यम्मी मम्मी म्हटले तर वावगे होणार नाही.ऐश्वर्या राय बच्चन मुलगी आराध्यावर जीवापाड प्रेम करणारी ऐश्वर्या सध्या चर्चेत आहे ती ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटातील रणबीर कपूरसोबतच्या तिच्या हॉट अॅण्ड इंटिमेट सीन्समुळे. ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये ४२ वर्षांची ऐश्वर्या कधी नव्हे इतकी हॉट दिसते आहे. आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याचे वजन कमालीचे वाढले होते. पण वर्षभरानंतर ऐश्वर्या पुन्हा तिच्या स्लीम-ड्रिम फिगरमध्ये परतली.या यम्मी मम्मीची फॅशन सेन्सही तेवढाच जबरदस्त आहे. यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सवात ऐशने तिच्या फॅशन सेन्सने सगळ्यांना अचंबित केले. पर्पल लिपस्टिक लावून कान्सच्या रेड कार्पेटवर उतरण्याचा ‘बोल्ड’ निर्णय तिने घेतला. (‘बोल्ड’ यासाठी की तिच्या पर्पल लिपस्टिकवर बरीच टीका झाली.) ही ग्लॅमरस ‘यम्मी मम्मा’ आजही कोट्यवधी रसिकांच्या मनावर राज्य करते, ते त्यामुळेच.काजोल काजोल ही बॉलिवूडमधील आणखी एक ‘यम्मी मम्मा’. न्यासासोबतचा काजोलचा एक फोटो अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल झाला. यातली काजोल पाहून आजही अनेकांच्या मनाचा ठोका चुकावा. मधल्या काळात काजोल चित्रपटांपासून दूर केली. पण अलीकडे ती पुन्हा परतली. नुकत्याच येऊन गेलेल्या ‘दिलवाले’मध्ये या ‘यम्मी मम्मा’चा सुपरहॉट अवतार पाहून कुठलाही ‘दिलवाला’ तिच्यावर भाळेल.जेनेलिया रितेश देशमुखची बेटरहाफ अर्थात जेनेलिया डिसूजा. दोन मुलांची आई होऊनही जेनेलियाचा चार्म जराही कमी झालेला नाही. फॅशनच्या बाबतीत आधीइतकीच परफेक्ट असणारी जेनेलिया म्हणजे बॉलिवूडची परफेक्ट ‘यम्मी मम्मा’. दीर्घकाळापासून जेनेलिया मोठ्या पडद्यावर दिसली नाही. पण रितेशसोबत अनेक इव्हेंटमध्ये ती अधूनमधून दिसते. जबरदस्त फॅशन सेन्स, चेहºयावर मधूर हास्य असलेली ही ‘यम्मी मम्मा’ मग सगळ्यांचे मन मोहून टाकते.शिल्पा शेट्टी शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडची ‘यम्मी मम्मा’ सध्या एका रिअॅलिटी डान्स शोची जज म्हणून दिसते आहे. फिटनेसच्या बाबतीत अतिशय जागृत असणारी ही ‘यम्मी मम्मा’ वेगवेगळ्या फॅशन स्टाईलमध्ये दिसते. तिचा सेक्सी अन् ग्लॅमरस अंदाज अनेकांना वेड लावतो, हे सांगणे नकोच.माधुरी दीक्षित इतक्या वर्षांनंतरही बॉलिवूडच्या या ‘धकधक गर्ल’वर मरणारे असंख्य चाहते आहे. दोन मुलांची आई असलेल्या माधुरीच्या सौंदर्याची जादू आजही ओसरलेली नाही. या ‘यम्मी मम्मा’चे हास्य आणि तिचा आगळा-वेगळा अंदाज आजही अनेकांना घायाळ करतो.श्रीदेवी श्रीदेवी म्हणजे आॅल टाईम फेवरेट ‘यम्मी मम्मी’. श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी तिच्या बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. पण पन्नासी ओलांडलेल्या श्रीदेवीचा जलवाही कमी नाही. वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये श्रीदेवीचा ग्लॅमरस लूक नव्या हिरोईनला लाजवणारा असतो.
‘या’ आहेत बॉलिवूडच्या ‘यम्मी सुपरमॉम्स’!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2016 4:54 PM