Join us

‘या’ बायोपिक चित्रपटांनी प्रेक्षकांना रडविले!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2018 12:07 PM

रिमेक आणि सिक्वेलच्या लाटेबरोबरच हिंंदी चित्रपटांमध्ये बायोपिक चित्रपटांचाही स्वतंत्र प्रवाह तयार झाला आहे. लोकप्रिय आणि कर्तृत्वान व्यक्तींवर बनविण्यात आलेल्या ...

रिमेक आणि सिक्वेलच्या लाटेबरोबरच हिंंदी चित्रपटांमध्ये बायोपिक चित्रपटांचाही स्वतंत्र प्रवाह तयार झाला आहे. लोकप्रिय आणि कर्तृत्वान व्यक्तींवर बनविण्यात आलेल्या बायोपिक रोमांचकारी ठरत आहेतच, शिवाय प्रेक्षकांच्या मनावरही प्रभाव सोडून जात आहेत. वास्तविक एखाद्या व्यक्तिमत्त्वाचे जीवन आणि कार्य प्रेक्षकांसमोर मांडणे दिग्दर्शक आणि निर्मात्यांसाठी आव्हानच आहे. मात्र ते हे आव्हान पेलताना दिसत आहेत. काही बायोपिक तर इतक्या हुबेहूबपणे पडद्यावर साकारल्या आहेत की, प्रेक्षकांना सिनेमागृहातच अश्रू अनावर झाले आहेत. अशाच इमोशनल बायोपिकचा घेतलेला हा आढावा...संजूअभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘संजू’ या बहुप्रतिक्षित बायोपिकचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरमध्ये संजय दत्तच्या वादग्रस्त आयुष्यापासून ते त्याच्या गांधीगिरीपर्यंतचा प्रवास अंगावर शहारे आणणारा दिसतो. ज्या पद्धतीने संजूबाबाचे आयुष्य पडद्यावर दाखविले जाणार आहे, त्यावरून प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू तरळतील यात दुमत नाही. या बायोपिकमध्ये संजय दत्तची भूमिका रणबीर कपूर साकारत आहे. एम.एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरीनीरज पांडे दिग्दर्शित ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ट स्टोरी’ हा बायोपिक केवळ अंगावर शहारेच निर्माण करीत नाही, तर उत्साह आणि आनंदाच्या भरात डोळ्यात अश्रूही आणतो. भारतीय क्रिकेट संघाचा सर्वांत यशस्वी माजी कर्णधार एम. एस. धोनीच्या जीवनावर आधारित असलेल्या या बायोपिकमध्ये सुशांत सिंग राजपूतचा अभिनय सर्वच पातळ्यांवर सरस ठरला आहे. प्रेक्षकांनी त्यावेळी चित्रपटाचे प्रचंड कौतुक केले. उत्तर प्रदेशात तर हा चित्रपट टॅक्स फ्री करून दाखविण्यात आला. सरबजित सरबजित सिंगच्या संघर्षपूर्ण जीवनावर आधारित एक सत्यघटना बायोपिकमध्ये दाखविण्यात आली. ओमंग कुमार यांचे दिग्दर्शन सर्वच पातळ्यांवर सरस ठरले. अभिनेता रणदीप हुडा याने साकारलेली सरबजितची भूमिका प्रेक्षकांना खुर्चीवर बांधून ठेवण्यात यशस्वी ठरली. त्याचबरोबर ऐश्वर्या राय आणि ऋचा चढ्ढा यांनीही त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय दिला. चित्रपटाची कथा सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत रोमान्च निर्माण करणारी आहे. भाग मिल्खा भागधावपटू मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित असलेला हा बायोपिक संघर्ष, आनंद आणि अश्रू या सर्वांचीच अनुभूती देऊन जातो. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेल्या या बायोपिकला ६१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वश्रेष्ठ मनोरंजनक चित्रपट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चित्रपटात फरहान अख्तरने मिल्खा सिंग यांची भूमिका साकारली आहे. मेरी कॉमबॉक्सर मेरी कॉमच्या जीवनावर आधारित असलेल्या या बायोपिकमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राने मेरीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचेही दिग्दर्शन ओमंक कुमार यांनी केले होते. एका दुर्गम भागातून येऊन आॅलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा फडकविणाºया मेरीची कथा अंगावर शहारे निर्माण करण्याचा प्रत्यय प्रेक्षकांना अनुभवता आला. पान सिंह तोमर‘पान सिंह तोमर’ या बायोपिकमध्ये अशा व्यक्तीची सत्यकथा दाखविली, ज्यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले, मात्र नाइलाजास्तव त्यांना नक्षलवादी बनावे लागले. तिग्मांशू धुलिया यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अभिनेता इरफान खान याने पान सिंह तोमरची भूमिका साकारली. हा चित्रपट २०१० मध्ये ब्रिटिश फिल्म इंस्टीट्यूट लंडन फिल्म समारंभात दाखविण्यात आला होता. पुढे २ मार्च २०१२ रोजी तो सर्वत्र प्रदर्शित केला.