Join us

...या बॉलिवूड स्टार्सचे जगभरात आहेत डाय हार्ट फॅन्स!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2017 11:17 AM

काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या ‘बाहुबली-२’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवरील सर्व रेकॉर्ड ब्रेक करीत कमाईच्या बाबतीत नवा कीर्तिमान रचला. त्यामुळे ...

काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या ‘बाहुबली-२’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवरील सर्व रेकॉर्ड ब्रेक करीत कमाईच्या बाबतीत नवा कीर्तिमान रचला. त्यामुळे या चित्रपटाचे रेकॉर्ड ब्रेक केले जातील काय? याविषयी साशंकता निर्माण केली जात असतानाच मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान याच्या ‘दंगल’ने चीनमध्ये एकच धूम ठोकत ‘बाहुबली-२’ला कमाईच्या बाबतीत धोबीपछाड दिली.आमीरने विदेशात मारलेली बाजी अनेकांच्या भुवया उंचविणारी असली तरी, त्याची विदेशातील लोकप्रियता अधोरेखित करणारी आहे. चिनी चाहते तर आमीरच्या प्रेमात अक्षरश: वेडे झाले असून, चक्क त्याच्या होर्डिंग्जसमोर सेल्फी घेताना बघावयास मिळत आहेत. आमीरप्रमाणेच बॉलिवूडमधील आणखी काही स्टार्स आहेत, ज्यांचे फॅन फॉलोअर्स जगातील कानाकोपºयात आहे. त्याचाच आढावा घेणारा हा वृत्तांत...शम्मी कपूरआपल्या आगळ्यावेगळ्या अभिनय शैलीने चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे दिवंगत अभिनेते शम्मी कपूर यांचे चाहते आजही जगाच्या कानाकोपºयात बघावयास मिळतील. ७०, ८० च्या दशकात बॉलिवूडमध्ये धूम उडवून देणाºया या अभिनेत्याने भारताबरोबरच विदेशी चाहत्यांनाही आपलेसे केले होते. जंगली डान्ससाठी प्रसिद्ध असणाºया शम्मी कपूर यांच्या याच डान्सची त्यांच्या विदेशी चाहत्यांवर भुरळ पडली होती. मिथुन चक्रवर्तीडिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती यांचा बॉलिवूडमध्ये आजही जलवा बघावयास मिळतो. संगीतात भाषेला समजून घेण्याची गरज नाही, ही बाब लोकांना तेव्हा कळाली जेव्हा मिथुनदाचे ‘आय एम अ डिस्को डान्सर’ आणि ‘जिमी जिमी’ हे गाणे रशियामध्ये प्रसिद्ध झाले होते. या दोन गाण्यांनी रशियामधील चाहत्यांना अक्षरश: वेड लावले होते. त्याचबरोबर मिथुनदानेदेखील येथील चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. आजही रशियामध्ये या गाण्यांचे बोल कानावर पडतात. राज कपूरराज कपूर यांचा कोणी फॅन नसेल असे म्हणणे जरा घाईचेच ठरेल. कारण जगाच्या कानाकोपºयात राज कपूर यांचा चाहतावर्ग आहे. एकेकाळी रशियन चाहते तर त्यांच्या प्रेमात अक्षरश: वेडे झाले होते. त्यामुळेच की काय, एकदा त्यांना विजा न घेताच रशियात बोलावले होते. त्यावेळी त्यांना रशियन चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळाले होते. अमिताभ बच्चन जर तुम्हाला महानायक अमिताभ बच्चन यांचे भारताबाहेरील डाय हार्ट फॅन बघायचे असतील तर तुम्हाला इजिप्तला जावे लागेल. कारण तेथील लोक कोणाही भारतीयाला बघितले तरी त्याच्यात अमिताभ बच्चन यांना शोधतात. त्यांच्याकडे अमिताभविषयी आपुलकीने विचारतात. मध्यंतरीच्या काळात तर असे ऐकण्यात आले होते की, जेव्हा अमिताभ इजिप्तच्या विमानतळावर उतरले होते तेव्हा तेथील फॅन्सनी त्यांना अक्षरश: घेराव घातला होता. फॅन्सच्या गराड्यातून बाहेर पडणे अमिताभ यांना मुश्कील झाले होते. शाहरूख खानबॉलिवूडचा किंग शाहरूख खान याचा चाहतावर्ग तर जगाच्या कानाकोपºयात बघावयास मिळेल. त्यातही जर्मनी आणि कोरियामध्ये शाहरूख प्रचंड प्रसिद्ध आहे. त्यामुळेच शाहरूखचे चित्रपट भारताबरोबरच विदेशातही चांगली कमाई करतात. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘कुछ कुछ होता है’, ‘चक दे इंडिया, ‘देवदास’ या चित्रपटांनी भारताबाहेर चांगला गल्ला जमविला आहे. काही भागात तर आजही हे चित्रपट बघितले जातात. ऐश्वर्या राय-बच्चनआपल्या सौंदर्याने जगाला मोहिनी घालणाºया अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचे जगभरात फॅन्स बघावयास मिळतील. तब्बल १५ वर्षे कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणाºया ऐशच्या चित्रपटांना पसंती देणारा चाहता जगातल्या कानाकोपºयात आहे.