बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सुंदर अभिनेत्री आहेत. देशात सुंदरता म्हटलं की गोऱ्या रंगाला महत्त्व दिले जाते. अशात बऱ्याचदा रंगभेदाबद्दल ऐकायला मिळते. नुकतेच बॉलिवूडचा किंग खान शाहरूखची मुलगी सुहाना खानला देखील रंगभेदावरून हिणवले गेले. खरेतर कित्येक सोशल मीडिया युजर्सने सुहानाच्या फोटोवर काळी या रंगावरून कमेंट केली. सुहानानेदेखील सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहे. बॉलिवूडमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांच्या करियरमध्ये कधीच सावळा रंग अडसर ठरला नाही. त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आपली ओळख निर्माण केली.
काजोल
बॉलिवूड अभिनेत्री काजोलने जेव्हा सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते तेव्हा तिचा रंग सावळा होता. तिच्या करिअरच्या सुरूवातील सर्व सिनेमात तिचा खरा रंग पहायला मिळाला. सावळा रंग असूनही काजोलने कित्येक वर्षे बॉलिवूडवर अधिराज्य गाजविले आणि आजदेखील टॉपच्या अभिनेत्रीमध्ये तिचा समावेश आहे.
राणी मुखर्जी
बंगाली बाला राणी मुखर्जीच्या नावाचे समावेश सावळ्या रंगाच्या अभिनेत्रींच्या यादीत आहे. राणी मुखर्जीने सावळा रंग असतानाही बॉलिवूडवर राज्य केले आहे. राणी मुखर्जीला विना मेकअप पाहिले की तुमच्या लक्षात येईल राणीचा रंगदेखील सावळा आहे. असे सांगितले जात आहे राणी मेकअपचा वापर तितकाच करते जितका कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी गरजेचा आहे.
प्रियंका चोप्रा
प्रियंका चोप्राने बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येदेखील आपले स्थान निर्माण केले आहे. प्रियंकाने २००० साली मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता. तिला सावळ्या रंगावरून कधीच हिणवले गेले नाही.
दीपिका पादुकोण
सध्या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये दीपिका पादुकोणचा समावेश आहे. दीपिका पादुकोणच्या चाहत्यांची संख्या खूप आहे. दीपिकादेखील गोरीपान नाही आहे. दीपिकाच्या सुरूवातीचे व्हिडिओ व सिनेमांमध्ये दीपिकाचा स्कीन टोन पाहू शकता. दीपिकाने आपल्या टॅलेंटच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान मिळविले आहे.
कोंकणा सेन शर्मा
अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा बॉलिवूडमधील टॅलेंटेड अभिनेत्रींपैकी एक आहे. कोंकणादेखील सावळी आहे. तिच्या कामात तिचा रंग कधीच अडसर ठरला नाही. कोणत्याही क्षेत्रात रंगापेक्षा टॅलेंट महत्त्वाचे आहे.