Join us

बॉलिवूडचे हे पाच कपल्स करतात जोडीने व्यायाम!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2017 11:14 AM

बॉलिवूड सेलेब्स त्यांच्या फिटनेसविषयी नेहमीच जागरूक असतात. कुठल्याही परिस्थिती ते आपल्या फिगरविषयी तडजोड करण्यास तयार नसतात. त्यामुळेच लग्नानंतरही आपल्या ...

बॉलिवूड सेलेब्स त्यांच्या फिटनेसविषयी नेहमीच जागरूक असतात. कुठल्याही परिस्थिती ते आपल्या फिगरविषयी तडजोड करण्यास तयार नसतात. त्यामुळेच लग्नानंतरही आपल्या जोडीदारासोबत ते जीममध्ये जाणे पसंत करतात. पार्टी, डेट्स, डिनर, इवेंट्स येथे एकत्र दिसणारे हे कपल्स जेव्हा जीममध्ये जाताना स्पॉट होतात, तेव्हा सर्वसामान्यांनाही त्यांचे कुतुहल वाटते. आज आम्ही अशाच पाच कपल्सविषयी माहिती देणार आहोत, जे जीममध्ये एकत्र जाणे पसंत करतात. या कपल्सची आपल्या फिटनेसप्रती असलेली जागरूकता बघून तुम्हीही आपल्या जीवनात व्यायामाला प्राधान्य द्याल हे नक्की.करण सिंग ग्रोवर आणि बिपाशा बासुबॉलिवूडमधील सर्वात हॉट कपल म्हणून ओळखले जाणारे करण सिंग ग्रोवर आणि बिपाशा बासु यांचे व्यायामाप्रती नेहमीच आकर्षण राहिले आहे. बॉक्सिंगची आवड असलेल्या बिपाशा लग्नानंतर व्यायामापासून दूर गेली नाही. उलट पती करण सिंग ग्रोवरबरोबर ती नित्यनियमाने जिमला जात असते. दोघांच्या जीमचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय राहिला आहे. आपल्या चाहत्यांना व्यायामाचे महत्त्व पटावे याकरीताच ते जीमचे फोटो सोशल अकाउंट शेअर करीत असल्याचे बिपाशाने एका कार्यक्रमात स्पष्ट केले होते. शाहिद कपूर आणि मीरा राजपूतगेल्या काही दिवसांपासून अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा एकत्र जीममध्ये जात असतानाचे फोटोज् मीडियात दाखविले जात आहेत. वास्तविक मीराला जीममध्ये येण्यास शाहिदनेच प्रोत्साहित केले. प्रेग्नेंसीनंतर मीराचे वजन वाढले होते. सध्या हे दोघेही नित्यनियमाने वर्कआउटसाठी एकत्र जीममध्ये जात असतात. सैफ अली खान आणि करिना कपूर-खानकाही दिवसांपूर्वीच अमृता अरोराने तिच्या सोशल अकाउंटवर काही व्हिडीओज शेअर केले होते. ज्याम्ध्ये ती करिना कपूर-खान हिच्याबरोबर वर्कआउट करताना दिसत होती. प्रेग्नेंसीनंतर करिनाचे वजन चांगलेच वाढले होते. तिला कुठल्याही परिस्थितीत पुर्वीसारखाच स्लिम फिगर मिळवायचा होता. त्यामुळे ती नियमितपणे जीममध्ये जात आहे. योगा आणि जीम हे तिच्या दिनक्रमातील मुख्य भाग बनले आहेत. जीमसाठी तिला बºयाचदा अमृता आणि मलाइका अरोरा यांची कंपनी मिळत आहे. त्याचबरोबर पती सैफबरोबरही ती वर्कआउट करताना बघावयास मिळाली आहे. जेव्हा शक्य होईल तेव्हा हे दोघे जीमला एकत्र जातात. सोहा अली खान आणि कुणाल खेमूमोठा भाऊ आणि वहिणी सैफ-करिणाप्रमाणेच सोहा अली खान आणि कुणाल खेमू हे देखील फिटनेसप्रती जागरूक आहेत. या दोघांना बºयाचदा एकत्र जीमला जाताना बघण्यात आले आहे. सध्या सोहा प्रेग्नेंट असून, कुणाल तिला लाइट वर्कआउट आणि योगाच्या टिप्स देत आहे. हे दोघेही फिटनेसप्रती विशेष जागरूक आहेत. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाबॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा फिटनेसप्रती प्रचंड जागरूक आहे. कितीही व्यस्त शेड्यूल्ड असले तरी, अक्षय वर्कआउट करण्यास तो वेळ काढतोच. यासाठी अक्षयला पत्नी ट्विंकलची नेहमीच कंपनी मिळत असते. त्यामुळे आजही हे कपल फिट दिसते. वास्तविक अक्षयची वर्कआउट करण्याची स्टाइल जरा वेगळी आहे. त्यामुळे ट्विंकल त्याला यासाठी कंपनी देऊ शकत नाही. मात्र योगा सेशनमध्ये हे दोघेही एकत्र योगा करतात. गेल्या योगा डेनिमित्त अक्षयने सोशल अकाउंटवर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये हे दोघे फिटनेसप्रती किती कॉनशियस आहेत हे दिसून येते.