‘या’ पाच कारणांमुळे ‘पद्मावती’च्या प्रदर्शनाची तारीख ढकलली पुढे !!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 12:01 PM
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून, त्यामागची ही पाच प्रमुख कारणे असावीत, वाचा सविस्तर!
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट आता १ डिसेंबर रोजी रिलीज होणार नाही. वायकॉम १८ नेटवर्कने याबाबतची अधिकृत घोषणा केली असून, पीटीआयने त्याबाबतची बातमी ट्विटरवरून प्रसिद्ध केली आहे. मात्र हा चित्रपट आता कधी प्रदर्शित केला जाईल, हे अद्यापपर्यंत निर्मात्यांनी स्पष्ट केले नाही. सूत्रानुसार पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात चित्रपट रिलीज केला जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचे नेमके कारण काय? हेदेखील अद्यापपर्यंत निर्मात्यांनी स्पष्ट केले नाही. परंतु आम्ही याबाबतचा पाठपुरावा केला असता, प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यामागे हे पाच कारण असावेत? १ - मेरठ येथील एका ठाकूर नेत्याने संजय लीला भन्साळी आणि दीपिका पादुकोण यांचा शिरच्छेद करणाºयाला पाच कोटी रुपयांचे बक्षीस देणार असल्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर अखिल भारतीय क्षत्रिय युवा महासभेचे राष्टÑीय अक्षय अभिषेक सोम यांनीदेखील संजय लीला भन्साळी आणि दीपिकाचे शिरच्छेद करणाºयास पाच कोटी रुपयांच्या बक्षिसांची घोषणा केली होती. अशात जर चित्रपट रिलीज झाला असता तर कदाचित विरोधाला हिंसक वळण मिळाले असते. हाच विचार करून निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली असावी. २ - राजस्थानातील बºयाचशा जिल्ह्यांमधील चित्रपटगृहमालकांनी चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला होता. वास्तविक सर्वत्र विरोध होत असताना राजस्थानमधून या चित्रपटाला आतापर्यंत सर्वाधिक विरोध झाला आहे. अशात डिस्ट्रिब्यूटर आणि थिएटरमालक यांची भूमिका संशयास्पद होती. त्यातच चित्रपट प्रदर्शित झाल्यास, चित्रपटगृहांची तोडफोड केली जाण्याची दाट शक्यता असल्याने प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असावी. ३ - दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी चित्रपट रिलीज होण्याच्या काही आठवडे अगोदरच मीडिया प्रतिनिधींकरिता चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग ठेवले होते. ज्यामुळे पत्रकारांमध्येच दोन गट निर्माण झाले आहेत. काही माध्यम प्रतिनिधींनी चित्रपटाचे समर्थन केले तर काहींनी चित्रपटाच्या विरोधात भूमिका मांडली. ४- उमा भारती, अनिल बिज, योगी आदित्यनाथ, स्मृती ईरानी आणि वसुंधरा राजे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याबद्दल वक्तव्य केले होते. ५ - चित्रपटाच्या कथेवरून सातत्याने वाद वाढत होता. असे म्हटले जात होते की, चित्रपटात राणी पद्मावती आणि अलाउद्दीन खिलजी यांच्यात काही अंतरंग दृश्य दाखविण्यात आले आहेत. त्यामुळेच जयपूरमधील करणी सेनेसह इतरही काही संघटनांनी चित्रपट प्रदर्शित करण्याअगोदर आम्हाला दाखवावा, अशी मागणी केली होती.