Join us

​‘या’ बॉलिवूड कपल्सचे ब्रेकअपनंतरही टिकून आहे मैत्रीप्रेम !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2017 10:58 AM

-रवींद्र मोरे बॉलिवूड कलाकारांची लव लाइफ एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. विशेष म्हणजे त्यांच्या खऱ्या आयुष्यातील लव स्टोरी जाणून घेण्यासाठी ...

-रवींद्र मोरे बॉलिवूड कलाकारांची लव लाइफ एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. विशेष म्हणजे त्यांच्या खऱ्या आयुष्यातील लव स्टोरी जाणून घेण्यासाठी सर्वसामान्य जनता खूपच उत्सुक असते. बॉलिवूडमध्ये असे काही कपल्स आहेत ज्यांची लव स्टोरी पूर्णत्वास आली म्हणजे त्यांनी लग्नदेखील केले मात्र काही कारणास्तव घटस्पोट झाला आणि ते आता सोबत असूनही सोबत नाहीत. म्हणजे त्यांचा घटस्पोट जरी झाला आहे तरी त्यांच्यात आज मैत्रीपूर्ण संबंध टिकून आहेत. जाणून घेऊया त्या स्टार कपल्सच्या बाबतीत. * ऋतिक रोशन आणि सुजैन खानया दोघांनी लग्नाच्या १७ व्या वर्षी आपासात समजोता करून एकमेकांपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता. अगोदर दोन्ही मुलांच्या कारणाने त्यांची भेट कधी कधी होत होती, मात्र काबिल चित्रपटाच्या निमित्ताने दोन्हीही एकमेकांच्या अधिक जवळ आले. घटस्पोटानंतर पुन्हा दोघेजण लग्न करणार असल्याच्या बातम्या पसरु  लागल्या होत्या. मात्र आम्ही फक्त चांगले मित्र आहोत, असे ऋतिकने सांगून त्या चर्चेवर पडदा टाकला. * आमिर खान आणि रीना दत्ताआमिर खान आणि रीना दत्ता यांचाही घटस्पोट कधीचा झाला आहे. मात्र आजही त्यांची मैत्री टिकून आहे. आमिर खानच्या बºयाच पार्ट्यांमध्ये रीनाने उपस्थिती दर्शविली आहे.* सलमान खान आणि कॅटरीना कैफसलमान आणि कॅटरीनाच्या अफेरबाबत खूपच बोलले गेले. बरीच वर्ष ते दोन्ही सोबत पब्लिक इव्हेंटमध्येही दिसून आले होते. अचानक एक दिवस त्यांच्या ब्रेकअपची बातमी झळकली. त्यानंतरही कॅटरीना सलमानच्या घरी काही फंक्शन असेल तरी हजेरी लावायला विसरत नाही. शिवाय दोन्ही ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातही एकत्र दिसले. * रणवीर सिंह आणि अनुष्का शर्मादोघांचा ब्रेकअप सर्वांना माहितच आहे, मात्र ‘बॅँड बाजा बारात’ या चित्रपटाच्या रिलीजनंतर दोघेही जवळ आले आणि पुन्हा चर्चेला उधाण सुरु झाले होते. पुन्हा दोघे वेगळे झाल्याच्या बातम्या आल्या, मात्र याचा परिणाम दोघांच्या मैत्रीवर झाला नाही आणि ‘दिल धडकने दो’ या चित्रपटात दोघांनी सोबत काम केले होत. * अरबाज आणि मलाइका अरोडाया दोघांची गणना बॉलिवूडमध्ये बेस्ट कपल्समध्ये करण्यात येत होती. मात्र लग्नाच्या तब्बल २३ वर्षानंतर दोघांनी गेल्यावर्षी घटस्पोट घेतला. मात्र घटस्पोटानंतरही दोघांची मैत्री टिकून आहे आणि बºयाचदा पार्ट्यांमध्ये सोबत एकत्र दिसले. * रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणदोघांचा ब्रेकअप सर्व जगाला माहित आहे. मात्र या दोघांच्या नात्याचे एक वैशिष्ट्ये म्हणजे दोघांमध्ये अगोदर लव, त्यानंतर हेट, आणि आता पुन्हा लव असे नाते दिसले. ब्रेकअपनंतर दोन्हीही ‘यह जवानी है दिवानी’ आणि तमाशा या चित्रपटात रोमान्स करताना दिसले होते.  * सैफ अली खान आणि अमृता सिंहसैफ आणि अमृताचा घटस्पोट होऊन बरीच वर्ष झालीत. त्यानंतर सैफने करिना कपूरशी लग्नही केले मात्र तरीही दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध टिकून आहेत ते फक्त मुलांमूळे. Also Read : ‘लिव्ह-इन’ रिलेशनशिप मध्ये राहिलेले बॉलिवूड सेलिब्रिटी!