‘या’ स्टार्सची ब्रॅण्डेड नव्हे फुटपाथवरील कपड्यांना पसंती!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2018 10:18 AM
ग्लॅमरच्या जगतात वावरणारे स्टार्स आपल्या ड्रेसिंग स्टाइलवरून नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी परिधान केलेले कुठलेही कपडे चाहत्यांमध्ये स्टाइलचा नवा ट्रेंड ...
ग्लॅमरच्या जगतात वावरणारे स्टार्स आपल्या ड्रेसिंग स्टाइलवरून नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी परिधान केलेले कुठलेही कपडे चाहत्यांमध्ये स्टाइलचा नवा ट्रेंड बनतो. बहुतांश स्टार्स आपल्या कपड्यांवर नेहमीच नवनवे एक्सपेरिमेंट करणे पसंत करतात. त्यासाठी लाखो रूपयांची उधळणही करतात. मात्र या झगमगाटाच्या दुनियेत काही स्टार्स असेही आहेत, जे आपल्या कपड्यांच्या स्टाइलवर अजिबातच पैशांची उधळण करीत नाहीत. कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण फुटपाथवरील कपडे खरेदी करण्याकडेही या स्टार्सचा कल असतो. अशाच स्टार्सच्या हटके स्टाइलचा आढावा घेणारा हा वृत्तांत... सनी देओलसाधी राहणी पसंत असणाºया स्टार्समध्ये सर्वांत अगोदर ‘घातक’ अभिनेता सनी देओलचे नाव घेता येईल. सनीला रिलच नव्हे तर रिअल लाइफमध्येही कपड्यांवर खर्च करणे आवडत नाही. तो केवळ कम्फर्ट मिळेल अशीच ड्रेसिंग स्टाइल करतो. त्याचबरोबर तो लाइमलाइटपासूनही चार हात लांब राहणे पसंत करतो. त्यामुळेच कदाचित सनी पाजी खूपच कमी वेळा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये बघावयास मिळतो. अक्षयकुमारखरं तर अक्षयकुमार त्याच्या प्रत्येक चित्रपटात खूपच स्टायलिस्ट दिसतो. मात्र खºयाखुºया आयुष्यात तो ब्रॅण्डेड कपड्यांना अजिबातच महत्त्व देत नाही. शूटिंग आटोपल्यानंतर त्याला नॉर्मल लूकमध्ये राहणे पसंत आहे. अक्षयकुमार वेळेचा पक्का असून, शूटिंग संपल्यानंतर तो लगेचच आपल्या फॅमिलीमध्ये परततो. सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही तो साध्या लूकमध्येच असतो. इमरान हाशमीबॉलिवूडचा सीरियल किसर इमरान हाशमी हा पडद्यावर आणि पडद्याबाहेर साधे राहणेच पसंत करतो. त्याच्याबद्दल असेही म्हटले जाते की, त्याला एखाद्या फुटपाथवरील कपडे पसंत आल्यास ते तो खरेदी करतो. मग ते कितीही स्वस्त असोत याची तो अजिबातच काळजी करीत नाही. त्याला साधे राहणीमान पसंत असल्याने तो ब्रॅण्डेड कपड्यांच्या मागे कधीच लागत नाही. सुशांत सिंग राजपूतबॉलिवूडमध्ये यशस्वी होण्यासाठी सातत्याने संघर्ष करीत असलेला अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या स्टाइलवर चाहते फिदा आहेत. परंतु त्याच्या खºयाखुºया आयुष्यात डोकावल्यास तुम्हाला त्याच्यात असा एक सर्वसामान्य तरुण बघावयास मिळेल ज्याला रस्त्यावरील स्वस्त कपडे खरेदी करण्यास काहीच वावगे वाटत नाही. तो असे कपडे परिधान करणे पसंत करतो, ज्यामध्ये त्याला कम्फर्ट मिळतो. मग ते स्वस्त असोत वा महाग. राजकुमार रावबॉलिवूडमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारून यशस्वी अभिनेता बनलेला राजकुमार राव खूपच साधे जीवन जगणे पसंत करतो. ज्या कपड्यांमधून कम्फर्ट मिळेल, तेच कपडे परिधान करण्यास त्याची प्राथमिकता असते. वास्तविक राजकुमार चित्रपटांमध्येही साध्या भूमिकांनाच प्राधान्य देत आला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी‘गॅँग्स आॅफ वासेपूर-२’मध्ये आपल्या अभिनयाने स्वत:ची ओळख निर्माण करणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी खूपच साधे जीवन जगणे पसंत करतो. पडद्यावर असो वा पडद्याबाहेर साध्या राहणीमानावरूनच त्याने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. नवाजने चित्रपटसृष्टीत येण्यासाठी खूप संघर्ष केला, हा संघर्ष त्याने वास्तविक जीवनात कायम ठेवला आहे. तो नेहमीच म्हणत आला की, तुम्ही कितीही मोठे झालात तरी, भुतकाळ विसरायला नको.