गायक कुमार सानू (Kumar Sanu ) यांना बॉलिवूडचे 'किंग ऑफ मेलडी' म्हटले जाते. त्यांची जुनी गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत. जणू त्यांचा आवाज तुमच्या कानात घुमतोय. मात्र त्या काळातील लोकप्रिय गायकांना सध्या काम मिळत नाही. ९०च्या दशकातील या स्टारने आता इंडस्ट्रीला प्रश्न केला आहे की त्यांच्या गाण्यांचे कौतुक आणि प्रेम मिळूनही त्यांना काम का दिले जात नाही!
कुमार सानू यांनी मुलाखतीत सांगितले की, संगीत दिग्दर्शकांकडून त्यांना अपार प्रेम, सन्मान आणि आदर कसा मिळतो याबद्दल बोलले, परंतु दुर्दैवाने, यापैकी काहीही कामाच्या संधींमध्ये रुपांतरित होत नाही. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत कुमार सानू म्हणाले, 'माझा आतापर्यंतचा प्रवास खूप चांगला आहे. इंडस्ट्रीत सगळेच माझा आदर करतात. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लोक आमचा आदर करतात, आमच्यावर प्रेम करतात आणि आमची गाणीही ऐकतात. हिंदी चित्रपटातील गाण्यांसाठी ते माझा आवाज का वापरत नाहीत, हे मला कळत नाही.
कुमार सानू यांना प्रेमावर आहे शंका कुमार सानू यांनी त्यांच्या 'प्रेमा'वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि विचारले की तेच लोक त्याला काही काम का देऊ शकत नाहीत. 'चुरा के दिल मेरा', 'जीता था जिसके लिए', 'नजर के सामने', 'सांस की नगरत', 'मैं दुनिया भुला दूंगा' यांसारख्या गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कुमार सानू यांनी सांगितले की, कधी कधी ते हैराण होतात की त्यांना मिळणारं प्रेम खरे आहे की खोटं?
कुमार सानू यांचे जगभरात होतात लाइव्ह परफॉर्मन्सते पुढे म्हणाले, 'माझ्या मनात हा प्रश्न येतो की ते माझ्यासमोर इतकं प्रेम दाखवतात तर ते मला गाणं का देत नाहीत. हे खरे आहे की नाही हे मला माहीत नाही. ते काहीही असले तरी ते नक्कीच आदर दाखवतात. कुमार सानू बॉलिवूडमधील पार्श्वगायनापासून दूर असले तरी ते जगभरात स्टेज शो करत असतात. त्यांनी नुकतेच यूएसए आणि कॅनडामध्ये परफॉर्म केले. त्यांनी शेवटचे नेटफ्लिक्स चित्रपट 'गन्स अँड गुलाब्स'मध्ये राजकुमार राव आणि 'त्रिभुवन मिश्रा सीए टॉपर' या मालिकेत मानव कौलसाठी गाणे गायले होते.