Join us

दारुचा एक थेंबही नाही शिवला या अभिनेत्यानं, पण निर्मात्याने बेवड्याचा रोल देत नाव दिलं 'व्हिस्की'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 6:37 PM

बॉलिवूडच्या या अभिनेत्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीही एक थेंबही दारू प्यायले नाहीत, परंतु कॅमेऱ्यासमोर येताच ते पूर्णपणे दारूच्या नशेत जायचे.

फोटोत दिसणार्‍या या व्यक्तीला तुम्ही ओळखता का? हे त्यांच्या काळातील एक प्रसिद्ध कॉमेडियन आहे ज्यांनी आपल्या कॉमेडीने लोकांना मनापासून हसवले. असे म्हणतात की या अभिनेत्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीही एक थेंब दारू प्यायली नाही, परंतु कॅमेऱ्यासमोर येताच ते पूर्णपणे दारूच्या नशेत जायचे. हे आहेत बॉलिवूडचे ६० आणि ७०च्या दशकातील प्रसिद्ध कॉमेडीयन जॉनी वॉकर.जॉनी वॉकरने आपल्या बॉलिवूड करिअरमध्ये एकापेक्षा जास्त सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आणि आपल्या कामाने लोकांचे भरपूर मनोरंजन केले.

जॉनी वॉकर यांचा जन्म १९२५ मध्ये मध्य प्रदेशातील इंदौर शहरात झाला. नंतर त्यांचे नाव बदरुद्दीन जमालुद्दीन काझी ठेवले गेले. त्यांचे वडील कापड गिरणीत मजूर होते आणि काही कारणास्तव गिरणीतील काम बंद पडल्यावर त्यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी मुंबईला आले. नंतर जॉनी वॉकर यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मुंबईतच बस कंडक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या जबरदस्त कॉमिक शैलीमुळे आणि विचित्र किस्से सांगण्याच्या पद्धतीमुळे बसमधील लोक त्यांच्यावर खूप आनंदी असायचे.

असा मिळाला पहिला सिनेमादरम्यान, अभिनेता बलराज साहनी यांनी बसमध्येच जॉनी वॉकर यांची प्रतिभा ओळखली. त्यावेळी बलराज साहनी गुरुदत्तसाठी बाजी या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहीत होते. जॉनी वॉकर यांचे काम पाहून गुरु दत्त त्यांच्याकडे गेले आणि त्यांना ऑडिशन देण्यासाठी सांगितले. बलराज साहनी यांच्या सांगण्यावरून जॉनी वॉकर स्टुडिओत पोहोचले. त्यांनी दारू प्यायली नव्हती, पण जेव्हा गुरु दत्त यांनी त्यांना ऑडिशनमध्ये एका दारूड्याची भूमिका करायला सांगितली तेव्हा जॉनी वॉकर यांनी एका मद्यपीची भूमिका इतकी चोख बजावली की गुरु दत्त यांनी लगेचच त्यांची चित्रपटासाठी निवड केली आणि त्यांना त्यांच्या आवडत्या व्हिस्की ब्रँडचे नाव जॉनी वॉकर दिले. १९५१ मध्ये बाजी सुपरहिट ठरला आणि यासोबतच जॉनी वॉकर यांच्या करिअरला सुरुवात झाली.

आजही त्यांची गाणी आहेत लोकप्रिय

जॉनी वॉकर यांनी त्यांच्या काळात एकापेक्षा जास्त सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. यात बाजी तसेच प्यासा, जाल, बरसात, टॅक्सी ड्रायव्हर, मिस्टर अँड मिसेस ५५, मिसेस ४२०, अंधियान, मधुमती, कागज के फूल या चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांमध्ये जॉनी वॉकर यांनी नायकाबरोबरच विनोदी कलाकार म्हणूनही लोकांच्या मनाचा ठाव घेतला. त्याच्यावर चित्रित केलेली गाणी प्रचंड हिट झाली. जाने कहां मेरा जिगर गया जी, दिल जो तेरा घरबाये, ए दिल है मुश्कील जीना यहाँ यांसारखी गाणी आजही लोकांच्या मनात घर करुन कायम आहे.

टॅग्स :जॉनी वॉकर