Join us

गेल्या ३० वर्षांपासून गायब आहे हा प्रसिद्ध अभिनेता, बायकोनंही केलं दुसरं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 19:12 IST

'कर्ज', 'अर्थ' आणि 'वारीस' सारख्या चित्रपटांमुळे प्रसिद्धीझोतात झालेला एक सुपरस्टार गेल्या अनेक वर्षांपासून बेपत्ता आहे. आजही कुटुंब त्याचा शोध घेत आहे पण त्याचा ठावठिकाणा माहित नाही.

'कर्ज', 'अर्थ' आणि 'वारीस' सारख्या चित्रपटांमुळे प्रसिद्धीझोतात झालेला एक सुपरस्टार गेल्या अनेक वर्षांपासून बेपत्ता आहे. आजही कुटुंब त्याचा शोध घेत आहे पण त्याचा ठावठिकाणा माहित नाही. आजही चाहते त्याचा चेहरा विसरू शकलेले नाहीत. पण त्याची कहाणी आजही अनुत्तरित आहे. त्याचे नेमके काय झाले हे सर्वांना जाणून घ्यायचे आहे.

हा अभिनेता म्हणजे राज किरण मेहतानी (Raj Kiran Mahtani). ज्याने कर्ज, एक नया रिश्ता, बेशारा, अर्थ, राज टिळक, जस्टिस चौधरी ते मान-अभिमान यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'घर हो तो ऐसा' या चित्रपटात राज किरणने अनिल कपूरच्या भावाची भूमिका साकारली होती, ज्याला मीनाक्षी शेषाद्रीने धडा शिकवला होता. नंतर राज किरण रिपोर्टर, आखीर कौन आणि आहट सारख्या काही टीव्ही शोमध्येही दिसला.

राज किरण ७०-८० च्या दशकात बॉलिवूडमध्ये काम करत होता. या काळात त्याने १०० चित्रपटांमध्ये काम केले. त्याच्या पत्नीचे नाव रूपा आहे. त्या दोघांनाही ऋषिका आणि मन्नत या दोन मुली होत्या. राजच्या संपूर्ण कुटुंबाला प्रसिद्धीपासून दूर राहणे आवडायचे. ते पुरस्कार सोहळ्यात किंवा कोणत्याही कार्यक्रमात फार क्वचितच दिसायचे. राज किरणला त्याच्या ढासळणाऱ्या कारकिर्दीची काळजी वाटत होती. करिअर अपयशी ठरत होते. त्याला साइड रोलमध्ये टाइपकास्ट केले जात होते आणि तो ते सहन करू शकत नव्हता. कालांतराने त्याचा मानसिक ताणही वाढू लागला. एकदा संडे मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत राज किरणने स्वतः म्हटले होते की, तो चित्रपटांमध्ये काहीतरी उत्तम काम करेल नाहीतर तो सोडून देईल.

अभिनेता पडला डिप्रेशनला बळीराज किरण नैराश्याचा बळी पडल्याने त्याच्या समस्या वाढल्या. त्याच्या उतरत्या कारकिर्दीमुळे तो तणावात येऊ लागला. या गोष्टींचा त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होत होता. मग अचानक एके दिवशी तो बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी अनेक वर्षे त्याचा शोध घेतला, पण आजपर्यंत त्याचे काय झाले हे कळले नाही. तो जिवंत आहे की नाही, हेदेखील कळले नाही.

झाला बेपत्ता२०११ मध्ये अचानक राज किरणबद्दल बातमी आली की, त्याला अटलांटातील मानसिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे हे ऐकून त्याच्या कुटुंबालाही धक्का बसला. अशा परिस्थितीत त्याची मुलगी ऋषिका महतानी हिला पुढे येऊन म्हणावे लागले की या सर्व बातम्या खोट्या आहेत. तिचे वडील सापडलेले नाहीत आणि त्याचे कुटुंब अजूनही त्याचा शोध घेत आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा त्याच्या बेपत्ता होण्याची बातमी आली तेव्हा कर्जचा मुख्य नायक ऋषी कपूर त्याला शोधण्यासाठी न्यूयॉर्कला गेले होते.

राज किरणची मुलगी म्हणालेली..'मिड डे'शी केलेल्या बातचीतमध्ये, राज किरणच्या मुलीने तिच्या वडिलांच्या बेपत्ता होण्याबद्दल सांगितले. तिने सांगितले की, राज किरण हा खूप खासगी व्यक्ती होता. त्याला त्याच्या आयुष्याची जाहिरात करायला आवडत नव्हती. पण जेव्हा वडील बेपत्ता झाले तेव्हा त्यांनी ही बाब अनेक वर्षे माध्यमांपासून लपवून ठेवली. त्यांनी अनेक खाजगी गुप्तहेरांनाही कामाला लावले. पण काही फायदा झाला नाही. तिचे वडील गेल्या ३० वर्षांपासून बेपत्ता आहेत आणि ते न्यूयॉर्कमधून बेपत्ता झाले होते. जरी त्याच्या मुलीने कबूल केले की तिचे वडील मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते.

पत्नीने केलं दुसरे लग्न काही माध्यमांच्या वृत्तांमध्ये असाही दावा करण्यात आला होता की, राज किरण बेपत्ता झाल्यानंतर त्याची पत्नी रूपाने दुसरे लग्न केले. ती आता तिच्या आयुष्यात व्यस्त आहे. जरी पत्नी कधीही पुढे येऊन याबद्दल बोलली नाही किंवा काहीही सांगितले नाही.