Join us  

Satish Kaushik: त्यामुळे झाला सतीश कौशिक यांचा मृत्यू, मृतदेहाच्या पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 1:30 PM

Satish Kaushik:

प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या अकाली मृत्युमुळे सिनेजगतात खळबळ उडाली आहे. तसेच त्यांच्या आकस्मिक मृत्यूबाबत अनेक सवालही निर्माण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सतीश कौशिक यांचा मृत्यू कसा झाला हे जाणून घेण्यासाटी त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, या पोस्टमार्टेमचा अहवाल आता समोर आला आहेत. 

पोस्टमार्टेमच्या रिपोर्टनुसार सतीश कौशिक यांचा मृत्यू हा ह्दयविकाराच्या धक्क्याने झाला आहे. तसेच त्यांच्या शरीरावर कुठल्याही जखमा आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे हा मृत्यू नैसर्गिक असल्याने पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आले आहे.

बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं आज  हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोविंदा सोबत मुत्तु स्वामी, पप्पू पेजर सारख्या भूमिका निभावणारे सतीश कौशिक यांचं अभिनय क्षेत्रातील पदार्पणही तितकंच फिल्मी होतं. वर्तमानपत्रात आपलं नाव यावं हे त्यांचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी ते अभिनेता बनले. सतीश कौशिक हे केवळ अभिनेते नाही तर दिग्दर्शक आणि लेखकही होते.. 'जाने भी दो यारो'साठी त्यांनी मजेदार डायलॉग लिहिले. तर दिग्दर्शक म्हणून त्यांचा 'रुप की रानी चोरो का राजा' हा पहिलाच चित्रपट होता जो सुपरहिट ठरला. सतीश कौशिक यांनी मिस्टर इंडियाचा 'कॅलेंडर' आणि दीवाना मस्तानाचा 'पप्पू' या भूमिकांमुळे ओळखले जाते.

टॅग्स :सतीश कौशिकबॉलिवूडसेलिब्रिटी