'हिंदी सिनेइंडस्ट्रीला मी परवडणार नाही' असं म्हणणारा साउथचा हा स्टार करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 01:22 PM2022-08-06T13:22:37+5:302022-08-06T13:23:13+5:30

South Star: हिंदी सिनेइंडस्ट्रीला मी परवडणार नाही असं विधान करून साउथचा हा स्टार वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

This South star who says 'I can't afford the Hindi cine industry' is making his debut in Bollywood | 'हिंदी सिनेइंडस्ट्रीला मी परवडणार नाही' असं म्हणणारा साउथचा हा स्टार करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण

'हिंदी सिनेइंडस्ट्रीला मी परवडणार नाही' असं म्हणणारा साउथचा हा स्टार करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण

googlenewsNext

साउथ सुपरस्टार महेश बाबू(Mahesh Babu)ने काही महिन्यांपूर्वी एक विधान केले होते, ज्यावरून बराच गदारोळ झाला होता. तो म्हणाला होता की बॉलिवूड त्याला परवडणार नाही! या विधानानंतर सोशल मीडियावर लोक दोन वर्गात विभागले गेले. काहींनी अभिनेत्याला समर्थन दिले तर काहींनी त्यावर आक्षेप घेतला होता. मात्र, आपल्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे त्याने नंतर स्पष्ट केले. पण आता एक मोठी बातमी समोर येत आहे. महेश बाबू लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 'बाहुबली' (Bahubali) आणि 'आरआरआर' (RRR) सारख्या चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या पुढील चित्रपटात तो दिसणार आहे, जो संपूर्ण मोठ्या स्तरावर बनवला जाणार आहे. 

'बॉलिवूड मी परवडत नाही...' असे विधान केल्यानंतर तेलुगू सुपरस्टार महेश बाबू पुन्हा एकदा चर्चेत आला होता. अभिनेत्याने शेवटी त्याचे शब्द मागे घेतले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, महेश बाबू आता हिंदी भाषिक प्रेक्षकांचीही मनं जिंकण्यासाठी सज्ज आहेत. प्रसिद्ध चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांच्या पुढील संपूर्ण भारतातील चित्रपटात काम करण्यास तो तयार असल्याचे बोलले जात आहे.


एसएस राजामौली यांनी बाहुबली सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट बनवला होता. या चित्रपटाचा दुसरा भाग बनवला, तोदेखील ब्लॉकबस्टर झाला. यावर्षी 'RRR' चित्रपट रिलीज झाला, या चित्रपटात राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांनी काम केले आहे. त्या दोघांसोबत अजय देवगण आणि आलिया भटदेखील पाहायला मिळाले. हा चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला.

या चित्रपटांच्या यशानंतर राजामौली आणखी एक चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. प्रभास, राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यासारख्या अभिनेत्यांसोबत काम केल्यानंतर सरकारू वारी पाटा (Sarkaru Vaari Patta) स्टारसोबत काम करण्यासाठी तयार आहे. महेश बाबू नुकताच 'सरकारू वारी पाटा'मध्ये दिसला. मात्र, हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित झाला नाही.

Web Title: This South star who says 'I can't afford the Hindi cine industry' is making his debut in Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.