Join us

ती प्रचंड घाबरली अन् म्हणाली..; 'शैतान' माधवनला पाहून अशी होती त्याच्या पत्नीची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 16:24 IST

'शैतान' सिनेमात आर. माधवनचा काळजाचा थरकाप उडवणारा लूक पाहून त्याच्या बायकोची अशी होती प्रतिक्रिया (Shaitaan Movie)

आर. माधवनच्या 'शैतान' (Shaitaan) सिनेमाचा ट्रेलर काल रिलीज झाला. 'शैतान' चा भयंकर ट्रेलर पाहून सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. सिनेमात अजय देवगण, (Ajay Devgn) ज्योतिका प्रमुख भूमिकेत आहेत. ट्रेलर पाहून जास्त चर्चा झाली ती म्हणजे आर.माधवनची. (R Madhavan) माधवनचा भयंकर शैतान लूक सर्वांच्या पसंतीस उतरला. माधवनचा लूक पाहून त्याच्या पत्नीची प्रतिक्रिया काय होती? याचा आश्चर्यकारक खुलासा माधवनने सांगितला. 

काल मुंबईत 'शैतान'चा ट्रेलर लॉंच सोहळा पार पडला. या ट्रेलर लॉंच सोहळ्याच्या वेळी माधवन म्हणाला, "मी माझ्या बायकोला माझा सिनेमातला पहिला लूक आणि संपूर्ण सिनेमा दाखवला. तेव्हा मला पक्कं आठवतंय की, ती माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहायला लागली. मी तुझ्यापासून दूर राहूनच बोलते, असं ती मला म्हणाली. या सिनेमामुळे माझ्या व्ययक्तिक आयुष्यावर थोडाफार प्रभाव पडलाय."

'शैतान' सिनेमात माधवन खलनायकी भूमिकेत झळकणार आहे. माधवन पहिल्यांदाच इतक्या भयंकर अवतारात पाहायला मिळतोय. ८ मार्चला 'शैतान' सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सिनेमात आर. माधवन, अजय देवगण, ज्योतिका, जानकी बोडीवाला या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. जिओ स्टूडिओजने या सिनेमाची निर्मिती केली आहे. 'शैतान' हा हॉरर थ्रिलर पाहायला सगळेच उत्सुक आहेत.

टॅग्स :अजय देवगणआर.माधवनबॉलिवूड